Agriculture Market Update: हिंगोली जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून कमी दरात केळीची खरेदी केली जात असल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन आठवड्यांत केळीचे दर प्रतिक्विंटल २,००० ते २,४०० रुपयांनी घसरले आहेत. बुधवारी (ता. २९) व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल केवळ १,२०० ते १,३०० रुपये दराने केळीची खरेदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे..हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, वारंगा (ता. कळमनुरी), गिरगाव, कुरुंदा (ता. वसमत) या महसूल मंडळांतील उर्ध्व पैनगंगा तसेच येलदरी-सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. व्यापारी थेट शेतावर जाऊन केळीची खरेदी करतात..Banana Crop Loss: केळी नुकसानग्रस्तांना मध्य प्रदेशच्या धर्तीवर भरपाई द्या.दोन आठवड्यांपूर्वी केळीला प्रतिक्विंटल ३,२०० ते ३,७०० रुपये दर मिळत होता. मात्र, मागील आठवड्यापासून दरात मोठी घसरण झाली आहे. अमेरिका-इराण संघर्षाचे कारण पुढे करत व्यापारी प्रतिक्विंटल १,२०० ते १,३०० रुपये दराने केळीची खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे..Banana Farmers Issue: दर समितीच्या निष्क्रियतेमुळे केळी उत्पादकांची लूट.याशिवाय, केळी वाहतुकीदरम्यान पानांचे (पत्तीचे) वजन न करता मनमानी पद्धतीने प्रति टन १ क्विंटल १० किलो वजनाची कपात केली जात असल्याची तक्रार आहे. शेतातून केळी खरेदी केल्यानंतर वजनाची पावतीही दिली जात नाही. तसेच खरेदी केलेल्या केळीची रक्कम १५ ते २० दिवसांनी देण्याची चुकीची पद्धत व्यापाऱ्यांनी सुरू केली असल्याचा आरोप आहे..अनेक व्यापारी विनापरवाना केळीची खरेदी करत असून, काही व्यापाऱ्यांनी केळी खरेदीनंतर शेतकऱ्यांना पैसे न देता फसवणूक केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत व्यापाऱ्यांवर तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.