Cotton Rate : हिंगणघाट बाजारपेठेत कापसाला ऐतिहासिक भाव; ९५११ रुपयांचा मिळाला कमाल दर!
Maharashtra Farmers : वर्धा हिंगणघाट बाजार समितीत खरीप हंगामातील कापूस खरेदीला गुरुवारी (ता. २९) प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी खुल्या लिलावात कापसाला प्रति क्विंटल ९५११ रुपयांचा कमाल तर ९१६० रुपयांचा सरासरी दर मिळाला. सुमारे दोन हजार क्विंटल कापसाची आवक नोंदविण्यात आली.