Akola News: शेतकऱ्यांचा पुढाकार आणि प्रशासनाची सकारात्मक साथ लाभली, तर बदल कसा घडू शकतो याचे उत्तम उदाहरण कानशिवणी (ता. अकोला) सज्जामध्ये सध्या दिसत आहे. डोंगरमाथ्यावरील मुरमाड जमिनीत तीन-चार वर्षांत १५० एकरांहून अधिक क्षेत्रावर फळबागा फुलल्या असून, काही बागांतून येत्या हंगामात प्रत्यक्ष उत्पादनही सुरू होईल..कानशिवणी भागातील जमीन पूर्वी उजाड, माळरान स्वरूपाची होती. मात्र चार वर्षांपूर्वी या सज्जासाठी कृषी सहायक (सध्याचे सहायक कृषी अधिकारी) म्हणून अशोक करवते यांची नियुक्ती झाली. त्यांनी या भागातील हवामान फळबागांसाठी पोषक असल्याचे ओळखून शेतकऱ्यांना संत्रा, आंबा, लिंबू, सीताफळ यांसारख्या फळपिकांकडे वळण्याचा प्रयत्न सुरू केला. सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठपुराव्यामुळे शेतकरी नव्या प्रयोगांसाठी तयार झाले. याचा सकारात्मक परिणाम २०२२-२३ मध्ये दिसून आला..Fruit Orchard Cultivation: नांदेड जिल्ह्यात २५४ हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण .महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १० हेक्टरवर संत्र्याची लागवड झाली, तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ४ हेक्टर संत्रा, ३ हेक्टर आंबा आणि १ हेक्टरवर लिंबाची लागवड झाली. पुढील वर्षी या योजनांमधून १४ हेक्टर, त्यानंतर ११ हेक्टर आणि चालू वर्षात २० हेक्टरवर फळबागा उभ्या राहिल्या..Fruit Orchard Cultivation: फळबाग लागवडीला बारामती उपविभागात गती.या योजनांतून कानशिवणी व येळवणमध्ये ६३ हेक्टरवर (सुमारे १५७ एकर) फळबागांची लागवड झाली. यात संत्रा ४५ हेक्टर (११२.५ एकर), आंबा १३, लिंबू ४ आणि सीताफळ १ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. दोन्ही गावशिवार मिळून क्षेत्र १५७ एकरांहून अधिक आहे..श्री. करवते यांनी तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकर व इतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी शास्त्रीय माहिती दिली. त्यामुळे शेतकरी आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने बागांचे नियोजन व व्यवस्थापन करत आहेत. खडकाळ जमिनीतही संत्र्याच्या बागा जोमाने वाढत असून, येत्या हंगामात काही बागांमधून उत्पादन सुरू होणार आहे. उजाड माळरानात फुललेल्या या फळबागा बदलत्या शेतीचे आशादायी चित्र उभे करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.