Horticulture Success: नाशिक जिल्ह्यात बागलाणच्या द्राक्ष उत्पादक पट्ट्यात ३० वर्षांपासून अधिक जोखीम अधिक दर हे सूत्र घेऊन आगाप द्राक्ष उत्पादन घेतले जात आहे. संकटांमध्येही नियोजन, तंत्रज्ञानाची जोड देत इथल्या शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा फुलवत त्या यशस्वीही केल्या आहेत. बागलाणचा शेतकरी म्हणजे मातीशी नातं अन् अस्मानीशी झुंज असे म्हणता येईल.