Akola News: येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात रब्बी हंगामासाठी विविध पिकांचे उच्च प्रतिचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने शाश्वत उगवण क्षमता, आनुवंशिक शुद्धता व सर्वोत्तम गुणवत्तेची खात्री असलेली हे बियाणे विद्यापीठातून खरेदी करावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे..यंदा शेतकऱ्यांसाठी हरभरा, गहू, करडई, रब्बी ज्वारी, जवस, मोहरी व कांदा या पिकांच्या विविध मान्यताप्राप्त वाणांचे ब्रिडर बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हरभऱ्याचे पीडीकेव्ही कनक, काबुली-२, जॅकी-९२१८ व कांचन, तर गव्हाचे पीडीकेव्ही सरदार, वाशीम व एकेएडब्ल्यू-४६२७ असे उच्च उत्पन्न देणारे बियाणे उपलब्ध आहेत..Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज प्रस्ताव वाढू लागले; कर्ज वितरण अल्प.करडई पिकात पीकेव्ही पिंक व एकेएस-२०७, रब्बी ज्वारीचे पीकेव्ही क्रांती, जवसाचे एनएल-२६०, मोहरीचे टीएएम-१०८-१ आणि कांद्याचे अकोला सफेद या जातींचे बियाणे आहे..Onion Planting: रब्बी कांदा लागवड स्थिर राहणार.हरभरा बियाणे अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, गव्हाचे अकोला, वाशीम, अमरावती, करडईचे वर्धा, चंद्रपूर, अकोला, रब्बी ज्वारी अकोला,चंद्रपूर, वाशीम, जवस नागपूर, अमरावती, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, अकोला, मोहरी नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अकोलाआणि कांदा बियाणे अमरावती, अकोला येथे उपलब्ध आहे..कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना लागवड तंत्रज्ञान आणि उगवण-पश्चात उपाययोजनांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते. रब्बी हंगाम अधिक यशस्वी व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे बियाणे व मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.* डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.