Certified Seeds: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित व प्रक्षेत्रावर उत्पादित दर्जेदार रब्बी हंगामातील विविध वाणांचे बियाणे बुधवारी (ता.१७) सकाळी ११ वाजता बीज प्रक्रिया केंद्रावरून शेतकऱ्यांसाठी विक्रीस उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात ज्वारी, हरभरा, गहू, बाजरी, चारा पिकांचे दर्जेदार वाण समाविष्ट आहेत.