Nagpur News: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मंत्री (रोहयो) भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक मनरेगा आयुक्तालय येथे झाली. या बैठकीत महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्या, कामकाजातील अडचणी तसेच प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली..बैठकीदरम्यान श्री. गोगावले यांनी संघटनेच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शासन व संघटना यांच्यात सखोल चर्चेनंतर संघटनेने सुरू असलेला संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नियमितपणे व जबाबदारीने कामकाज सुरू ठेवण्याची हमी दिली..MGNREGA Scheme: ‘मनरेगा’ ते ‘पूज्य बापू’ प्रवास!.संप मागे घेतल्यामुळे मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती मिळणार असून ग्रामीण विकासाच्या योजनांची अंमलबजावणी सुरळीत होण्यास मदत होणार आहे. बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, रोहयो विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त (मनरेगा) डॉ. भरत बास्टेवाड, सहसचिव अतुल कोदे, उपसचिव अरविंद पगार, कक्ष अधिकारी भरतसिंग निकुंभ, संदीप पवार तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष वासुदेव सोळंके, सरचिटणीस तुकाराम भालके.MGNREGA Scam: ‘मनरेगा’त घोटाळा ‘सीईओं’च्या कारवाईकडे लक्ष.विभागीय समन्वयक कमलकिशोर फुटाणे, कोषाध्यक्ष रत्नाकर पगार, महिला प्रतिनिधी श्रीमती ज्ञानदा फणसे, समन्वयक संदीप वायाळ, उमेश निकम, अक्षय भगत, डॉ. महेश बेळेकर, डॉ. स्वप्निल मेश्राम, भारत वेंदे, श्रीमती अंशुजा गराटे, श्रीमती मरसकोल्हे, मधुकर वासनिक उपस्थित होते. शासन व अधिकारी संघटना यांच्यातील संवादातून सकारात्मक तोडगा निघाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे..जबाबदारीने काम करण्याची हमीयावेळी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नियमितपणे व जबाबदारीने कामकाज सुरू ठेवण्याची हमी दिली. संप मागे घेतल्यामुळे मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती मिळणार असून ग्रामीण विकासाच्या योजनांची अंमलबजावणी सुरळीत होण्यास मदत होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.