डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. खिजर बेग, डॉ. बस्वराज भेदेकोरडवाहू शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी विदेशातील लागवडीच्या धर्तीवर कमी अंतरावर लागवड करून हेक्टरी रोपांची संख्या वाढवणे शक्य आहे. यासाठी मागील दहा वर्षांत संशोधन करण्यात येऊन कोरडवाहू भागातील शेतकऱ्यासाठी सघन कापूस लागवड पद्धत विकसित करण्यात आली आहे. या पद्धतीद्वारे कोरडवाहू, तसेच बागायती लागवडीमध्येही लक्षणीय वाढ आढळून आली आहे..महाराष्ट्राच्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यासाठी कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कापूस पिकाची सन २०२५-२६ वर्षाची जागतिक व राष्ट्रीय उत्पादकता (अनुक्रमे ८९३ किलो व ४४८ किलो रुई) पाहता महाराष्ट्राची उत्पादकता (३२२ किलो रुई) फार कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राच्या कापूस क्षेत्रापैकी मोठ्या प्रमाणात कोरडवाहू लागवड होते. कापूस उत्पादकतेमध्ये अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रांमध्ये बहुतांश लागवड कमी अंतरावर होते आणि यासाठी सरळ वाणांचा वापर करण्यात येतो. सरळ वाणांची सघन लागवड या पर्यायावर मागील दहा वर्षांत झालेल्या संशोधनातून उत्तम निष्कर्ष मिळाले आहेत. त्यामुळे कपाशीची उत्पादकता वाढविण्यासाठी सघन लागवड पद्धत हा निश्चितच चांगला पर्याय ठरणार आहे..Cotton Crop Management: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर कापूस व्यवस्थापन .सघन लागवड पद्धत म्हणजे काय?कपाशीची लागवड कमी अंतरावर करून हेक्टरी / एकरी झाडांची संख्या म्हणजेच घनता वाढविणे यालाच सघन लागवड पद्धत म्हटले जाते. सघन लागवड पद्धतीमध्ये योग्य लागवडीचे अंतर ठेवणे, त्यासाठी अनुरूप वाणांची निवड करणे, पिकाची वाढ सीमित (नियंत्रित) ठेवण्यासाठी वाढ व्यवस्थापन करणे आणि वाढलेल्या झाडांच्या संख्येसाठी आवश्यक व पुरेसा अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे या बाबींवर भर देण्याची आवश्यकता असते..वाणांची निवडसद्यःस्थितीमध्ये महाराष्ट्रात लागवडीखाली असणारे बहुतांश बीटी कापूस वाण दीर्घ कालावधीचे, वाढ अधिक असणारे व खत आणि सिंचनास प्रतिसाद देणारे आहेत. भारतामध्ये संकरित वाण मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तथापि सघन लागवड पद्धतीसाठी आटोपशीर ठेवण असणारे (कॉम्पॅक्ट) म्हणजेच ज्यांच्या फांद्यांची लांबी कमी (२०-२५ सेंमी) आणि झाडाची उंची कमी (३-३.५ फूट) आहे, असेच वाण निवडावेत. त्यांचा कालावधीही कमी असावा. बाजारातील बहुतांश प्रचलीत / लोकप्रिय वाण या निकषामध्ये बसत नाहीत. त्यामुळे सघन लागवडीसाठी योग्य त्या वाणांची निवड करण्याची काळजी घेतली पाहिजे..सघन लागवडीसाठी वर शिफारस केल्याप्रमाणे बियाण्याचे प्रमाण जास्त लागत असल्यामुळे संकरित वाणाऐवजी विद्यापीठाद्वारे अथवा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे निर्मित सरळ वाणांचा वापर केल्यास बियाण्यावरील खर्च कमी करता येईल..सघन लागवडीसाठी महत्त्वाचेजमिनीचा प्रकार व सिंचनाची उपलब्धता यानुसार लागवडीचे अंतर निवडावे.आटोपशीर ठेवण (कॉम्पॅक्ट) असणारा कमी कालावधीचा वाण निवडावा.वाढीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. मनुष्यबळ उपलब्धतेनुसार वाढरोधकाचा वापर किंवा वाढ फांदी व शेंडा कापणे यापैकी एक पर्याय अवश्य वापरावा.अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे.गरजेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा..लागवडीचे अंतरसर्वसाधारणपणे महाराष्ट्रात विभागनिहाय व माती प्रकारानुसार कपाशीची लागवड ३ × २ फूट, ४ × १.५ फूट, ३ × ३ फूट, ४ × ३ फूट, ५ × १ फूट, ६ × १ फूट अशा विविध अंतरावर करण्यात येते. या विविध पारंपारिक अंतरावरील लागवडीमध्ये एकरी झाडांची संख्या अनुक्रमे ७२६०, ४८४०, ३६३०, ८७१२ अशी असते. तथापि, सघन लागवडीमध्ये अंतरानुसार एक एकर क्षेत्रामध्ये १४,८१४ ते २९,६२९ रोपे बसतील. म्हणजेच एकरी झाडांची संख्या पारंपारिक लागवडीच्या तुलनेत दुप्पट ते चारपट राहते. वाढलेली झाडांची संख्या हेच या सघन लागवडीच्या यशाचे गमक आहे..सघन लागवड पद्धतीसाठी मातीचा प्रकार (हलकी / भारी किंवा उथळ/खोल) यानुसार पुढीलप्रमाणे दोन अंतरांच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत..लागवड प्रकार जमिनीचा प्रकार शिफारस केलेले अंतर एकरी रोपांची संख्या संकरित वाणांसाठी बियाणे प्रमाण (प्रति एकर)सघन कापूस लागवड उथळ - काळी व लाल ९० × १५ सेंमी(३ × ०.५ फूट) २९,६२९ ३ किलो/एकर (६-७ पाकिटे)कमी अंतरावरील लागवड खोल - भारी काळी ९० × ३० सेंमी(३ × १ फूट) १४,८१४ १.५ किलो/एकर (३ ते ३.५ पाकिटे).Cotton Cultivation Tips: कपाशी लागवडीची पंचसूत्री.वाढ नियंत्रित ठेवणेकपाशीची लागवड कमी अंतरावर केल्यामुळे वाढीच्या काळात आर्द्रता जास्त असल्यास दाटी होऊन पातेगळ किंवा बोंडसड होऊ शकते. त्यामुळे सघन लागवडीमध्ये वाढ नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. कपाशीमध्ये वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी वाढरोधकाचा वापर आणि वाढ फांदी कापणे-शेंडा खुडणे हे दोन पर्याय आहेत. आपल्याकडील मनुष्यबळाची उपलब्धता पाहून दोन्हीपैकी एक पर्याय निवडावा..अ) वाढरोधकाचा वापरसघन कापूस लागवडीमध्ये झाडांची वाढ आटोक्यात ठेवण्यासाठी वाढरोधकांचा वापर करणे आवश्यक आहे. वाढरोधकांचा वापर करून उंची तीन फुटांपर्यंत नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. याकरिता ‘मेपीक्वाट क्लोराइड’ या वाढरोधकाची दोन वेळा फवारणी करावी लागेल..मेपीक्वाट क्लोराइड (५% एएस) या वाढरोधकाच्या फवारणीचा तपशीलवाढरोधक फवारणी संख्या लागवडीपासून दिवस प्रमाण प्रति एकर प्रमाण प्रति १० लिटर पाणी(२०० लीटर पाणी/एकर)पहिली फवारणी लागवडीनंतर ४०-५० दिवसांनी झाडाला पाते लागण्याची अवस्था २०० मि.लि. १० मि.लि.दुसरी फवारणी लागवडीनंतर ५५-६५ दिवसांनी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी २५० मि.लि. १२.५ मि.लि.तिसरी फवारणी (आवश्यकता असल्यासच) भारी जमिनीमध्ये व अनुकूल पाऊसमान असताना पिकाची वाढ जास्त झाल्यास २५० मि.लि. १२.५ मि.लि..वाढरोधकाची फवारणी करताना जमिनीमध्ये ओल असणे आवश्यक आहे. जमिनीमध्ये ओल नसल्यास पाऊस होईपर्यंत ३-४ दिवस फवारणीसाठी थांबावे अथवा उपलब्धता असल्यास संरक्षित सिंचन देऊन फवारणी करावी.वाढरोधकाचा परिणाम : या वाढरोधकाच्या फवारणीमुळे कापूस पिकाच्या कांड्यांमधील अंतर कमी होते. म्हणजेच शाकीय वाढीसाठी वापरले जाणारे अन्नघटक फुले लागणे आणि बोंडाची वाढ होण्याकरिता वापरली जातात. झाडाची उंची आणि फांद्यांची लांबी आटोक्यात राहते आणि फुले आणि बोंडांच्या संख्येत वाढ होते. सघन लागवडीमध्ये पिकाची वाढ जास्त झाली तर अपेक्षित उत्पादन मिळणार नाही..ब) वाढ फांदी कापणे व शेंडा खुडणेवाढ फांदी कापणे : कपाशीच्या ज्या फांद्यांना सुरुवातीच्या काळात पाते-फुले लागत नाहीत अशा फांद्यांना वाढ / गळ / सोट फांदी असे म्हणतात. या फांद्या सिकेटरने मुख्य खोडापासून १-२ इंच अंतरावर कापाव्यात. यामुळे वाढीकरिता वापरले जाणारे अन्नघटक बोंडांच्या वाढीसाठी वापरले जातात. यामुळे कमी अंतरावरील कापूस दाटत नाही.शेंडा खुडणे : सघन लागवडीमध्ये पीक ८० दिवसांचे झाल्यानंतर मुख्य खोडाचा शेंड्याकडील भाग (२-४ इंच) हाताने खुडावा. यामुळे शेंड्याकडील बोंडांची वाढ होऊन वजन वाढते.मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी फांदी कापणे व शेंडा खुडणे हा पर्याय करावा. मनुष्यबळाची कमतरता असलेल्या शेतकऱ्यांनी वाढरोधकाचा वापर करावा..खत व्यवस्थापनसघन लागवडीमध्ये एकरी झाडांची संख्या वाढवून उत्पादनवाढ मिळणे अपेक्षित आहे. अधिकची झाडे आणि अपेक्षित वाढीव उत्पादन याकरिता एकंदर पिकाचे एकरी जैविक उत्पादन (शाकीय वाढ + कपाशीचे वजन) अधिक होईल. त्याकरिता कापसाच्या वाढलेल्या जैविक उत्पादनास अनुरूप आवश्यक अन्नपुरवठा होणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या विभागात पारंपरिक पद्धतीने बीटी कापूस पिकास द्यावयाच्या स्फुरद व पालाश खत मात्रेच्या २५% अधिक मात्रा द्यावी. मात्र नत्राची मात्रा वाढविण्याची गरज नाही. नत्राची मात्रा जास्त झाल्यास शाकीय वाढ जास्त होईल आणि पाते-फुले यांची संख्या कमी होईल. म्हणून नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा..खतांची मात्रारासायनिक खतांची मात्रा खताची मात्रा देण्याची वेळ अन्नद्रव्यांचे प्रमाण (नत्र, स्फुरद व पालाश) किलो प्रति हेक्टरबेसल डोस / पहिली मात्रा लागवडीच्या वेळी ४८ : ७५ : ७५दुसरी मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी ३६ : ० : ०तिसरी मात्रा लागवडीनंतर ६० दिवसांनी ३६ : ० : ०एकूण -- १२० : ७५ : ७५- डॉ. अरविंद द. पांडागळे, ७५८८५८१७१३ (कापूस संशोधन केंद्र, नांदेड अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.