Jalgaon News: खानदेशात डीएपी, १०.२६.२६ ची मागणी कायम आहे. यातच केळी, पपई, कलिंगड, खरबूज आदी फळ पिकांची लागवड सुरू आहे. त्यासाठी बेसल डोससंबंधी संयुक्त खतांची मागणी अधिक आहे. यंदा जलसाठे मुबलक असल्याने फळबागायती वाढली असून, खतांची मागणीही अधिक आहे. .सुपर फॉस्फेटची गरजही आहे. पण खतकंपन्या पुरवठा करतात, त्यावर कृषी विभागाचे नियमन असते. पुरवठा कमी झाल्यास अडचणी येतात. काही खतांचा पुरवठा कमी आहे. त्यात संयुक्त खतांची मागणी केळी व भाजीपाला पट्ट्यात म्हणजेच जळगावातील रावेर, यावल, जामनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागांत अधिक आहे. खतपुरवठा या हंगामात सुरू आहे..Fertilizer Demand : रायगडमध्ये खरिपासाठी हवे ११,९३२ टन युरिया.डीएपी व १०.२६.२६ या खतांचा पुरवठा करून घेण्यासंबंधी कृषी विभागाचा सतत पाठपुरावा आहे. या खतांची मागणी सर्वाधिक असते. परंतु पुरवठा कमी असतो. या खताची जळगाव जिल्ह्यात खरिपात २२ ते २६ हजार टन मागणी असते..Fertilizer Demand : खरिपासाठी १ लाख ५९ हजार टन रासायनिक खतांची मागणी.युरियाची मागणीदेखील १०.२६.२६ सारखीच आहे. अनेक शेतकरी एकाच वेळी युरियाची खरेदी करीत आहेत. यामुळे मागणी अधिक आणि खतांचा तुटवडा, अशी स्थिती काही भागात असते. प्रत्येक भागात समान वितरण व एकाच शेतकऱ्यास अधिकचे खत देणे टाळले पाहिजे, असाही मुद्दा उपस्थित होत आहे. रब्बीत दीड लाख टन विविध खते जिल्ह्यात येतील. त्याचा पुरवठा लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केला आहे..परंतु या लक्ष्यांकानुसार पुरवठा करणे खत कंपन्यांवर अवलंबून आहे. यामुळे कृषी विभागासमोर हा पुरवठा करून घेण्याचे आव्हान आहे. त्यात कमाल कंपन्या शासनाच्या किंवा केंद्र सरकार पुरस्कृत आहेत. त्यांच्यावर थेट कारवाई करणेही शक्य नसते. नॅनो डीएपी, नॅनो युरिया आहे. पण शेतकरी त्याचा वापर कमी करतात. दाणेदार डीएपी व दाणेदार, बारीक युरियाची मागणी केली जाते. या दाणेदार खतांचा अट्टहास, उपयोग मर्यादित करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.