Nagpur News : बल्लारशाह-चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील वनक्षेत्रातून वेगात धावणाऱ्या रेल्वेंमुळे अपघात होऊन दरवर्षी वाघांसह इतर अनेक वन्यजीव मृत्युमुखी पडत आहेत. या दहा ते बारा किलोमीटरच्या वन क्षेत्रामध्ये कुंपण व्यवस्थेसाठी काय उपाययोजना आहे, यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे आणि वन विभागाला दिले. त्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी न्यायालयाने दिला. .पर्यावरणप्रेमी उदयन पाटील व स्वानंद सोनी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, बल्लारशाह-चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातामुळे २००१ ते २०२१ या २० वर्षांत १३० वन्यजीव ठार झाले. .Wildlife Terror : खरिपात वाघासोबत हत्तींची दहशत .त्यामध्ये वाघ, गरुड, अजगर, बिबट, तरस यासह शेड्युल-१ श्रेणीतील इतर अनेक प्राण्यांचा समावेश आहे. ही रेल्वे लाइन २५० किलोमीटर लांब आहे. त्यापैकी ६० किलोमीटर लाइन ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्य, चंद्रपूर वनक्षेत्र, गोंदिया वनक्षेत्र व नवेगाव-नागझिरा व्याघ्र अभयारण्याच्या घनदाट व संवेदनशील वनक्षेत्रातून जाते. या लाइनवर रोज २४ प्रवासी रेल्वे व अनेक मालवाहू रेल्वे धावतात, असे याचिकेत नमूद आहे..Wildlife Crop Damage Compensation: वन्यप्राण्यांमुळे पीक नुकसानीची भरपाई कशी मिळते?.न्यायालयाने रेल्वे व वन विभागाला दोन महिन्यांपूर्वीच नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप यावर उत्तर आलेले नाही. त्यामुळे रेल्वेने यावर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच, कुंपण लावण्यासाठी उपाययोजनाही सुचवाव्यात असेही आदेश न्यायालयाने दिले..या काळात चार प्राण्यांचा मृत्यूया प्रकरणाची मागील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर आजवर चार प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाला देण्यात आली. ३१ ऑगस्ट रोजी मादी अस्वलासह तिच्या दोन पिलांचा, ८ सप्टेंबर रोजी सांबराच्या पिलाचा मृत्यू झाला. यावर न्यायालयाने रेल्वे व वन विभागावर ताशेरे ओढले. तसेच, दोन आठवड्यांचा अवधी देऊनही उत्तर दाखल न केल्याने नाराजी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.