डॉ. रवींद्र जाधवदुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम, स्फुरद व मॅग्नेशिअम या प्रमुख खनिज क्षारांचे अनन्यसाधारण महत्त्व असून संक्रमण कालावधीमध्ये (विण्यापूर्वी ३ आठवडे व व्यायल्यानंतर ३ आठवडे) या खनिजांची सुप्त किंवा दृश्य कमतरता जनावराच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम करू शकते. साधारणपणे जास्त दुग्धउत्पादकता असलेल्या जनावरांमध्ये खनिज कमतरता दिसते, त्यामुळे आजार होतात. .संक्रमण कालावधीमध्ये गाभण काळाच्या शेवटच्या दिवसांत गर्भातील झपाट्याने होत असलेल्या वासराच्या वाढीसहित आणि व्यायल्यानंतरच्या काळात दुग्धनिर्मितीसाठी खनिजक्षारांची गरज जास्त असते आणि अशा वेळी जर तत्सम खनिज क्षारांची आहारात कमतरता निर्माण झाल्यास किंवा शरीरातील उपलब्ध साठ्यातून रक्तामध्ये पुरवठा करण्याची प्रक्रिया सुप्त अवस्थेत असल्यास जनावरांमध्ये खनिज कमतरता दिसते. .यामध्ये दुधाळ जनावरांत कॅल्शिअमची सुप्त कमतरता ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची खनिज क्षार कमतरता आहे. संक्रमण काळादरम्यान दुधाळ जनावराच्या रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण ८.६ मिलिग्रॅम/१०० मिलि पेक्षा कमी आढळल्यास व सदर जनावरात कॅल्शिअम कमतरतेचे कोणतेही दृश्य किंवा बाह्य लक्षण आढळून न आल्यास अशा कमतरतेला सुप्त कॅल्शिअम कमतरता म्हणतात..Animal Care: भौतिक सुविधांपेक्षा जनावरांच्या आरोग्यावर भर.जनावराच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम हे अत्यंत महत्त्वाचे प्रमुख खनिज असून त्याची गरज स्नायूंच्या आकुंचन-प्रसरण पावण्यासाठी, उत्तम प्रतिकारशक्तीसाठी, रक्ताचा गोठवणूक गुणधर्म सुस्थितीत ठेवण्यासाठी, चेतासंस्थेच्या सुयोग्य वहनप्रक्रियेसाठी तसेच दूध निर्मिती योग्य होण्यासाठी आवश्यक असते. .संक्रमण कालावधीमध्ये प्रामुख्याने व्यायल्यानंतर ४८ तासाच्या कालावधीमध्ये चिकामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणावर श्रवले जाते, अशावेळी आहारातून कॅल्शिअम योग्य प्रमाणात न मिळाल्यास तसेच हाडांमधील साठ्यातून कॅल्शिअमची रक्तामध्ये वहनप्रक्रिया कार्यान्वित न झाल्यास अशा जनावराच्या रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन जनावरास दुग्धज्वर आजार होतो..Animal Care: ऊस वाढ्याचा जनावरांवर परिणाम.कॅल्शिअम कमतरतेमुळे गर्भाशयास सूज येणे, पोटाचा जठराशय, कप्पा विस्थापित होणे, व्यायल्यानंतर गर्भाशयात वार अडकणे, कासदाह, कितनबाधा यांसारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतो तसेच प्रजननक्षमता व दुग्धउत्पादन कमी होते. संक्रमण कालावधीमध्ये प्रामुख्याने म्हशींमध्ये विण्यापूर्वी तर गायींमध्ये व्यायल्यानंतर रक्त तपासणी करणे आवश्यक आहे जेणेकरून वेळेत निदान झाल्यास प्रतिबंधात्मक उपचार करून भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल. सुप्त कॅल्शिअम कमतरता जवळपास ५०टक्के दुधाळ गायींना बाधित करत असून अशा गायींमध्ये गर्भाशयाची सूज, कितनबाधा असे आजार दिसतात..उपाययोजनागाभण काळातील शेवटच्या टप्प्यात आणि व्यायल्यानंतर सुरवातीचे दिवस दुधाळ जनावराचे आहार व्यवस्थापन त्या जनावराच्या गरजा लक्षात घेऊन करावे.गाभण काळातील शेवटच्या टप्प्यात दुधाळ जनावर लठ्ठ होणार नाही याची आहार व्यवस्थापनातून काळजी घ्यावी.गाभण काळातील शेवटच्या टप्प्यात (२-३ आठवडे) दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअमचे प्रमाण नियंत्रित ठेवून अनायनिक क्षार (अमोनियम क्लोराईड, आमोनियम सल्फेट) दिल्यास पॅराथायरॉइड संप्रेरक कार्यान्वित होऊन त्याद्वारे आहारातील कॅल्शिअमचे उच्चतम शोषण होते. आवश्यकतेनुसार हाडातील कॅल्शिअमचा पुरवठा रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण योग्य मात्रेत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो.भाकड कालावधीमध्ये जनावरांना जास्त कॅल्शिअम (१०० ग्रॅम प्रति दिन) देणे टाळावे.संक्रमण कालावधीमधील जनावरांना चांगला निवारा देवून थंडीपासून संरक्षण द्यावे. योग्य व्यायाम द्यावा जेणेकरून पचनसंस्था कार्य सुस्थितीत राहील.संक्रमण कालावधीमध्ये जनावरांचा लांब पल्ल्याचा प्रवास टाळावा.दुधाळ जनावरांना साधारणपणे विण्यापूर्वी व व्यायल्यानंतर ४८ तास निरीक्षणाखाली ठेवावे.दुग्धज्वर आजार दिसून आल्यास वेळेवर उपचार करावेत.दुधाळ जनावरांना आहारात वळलेला चारा योग्य प्रमाणात देण्यात यावा. जेणेकरून ओटीपोटाची हालचाल नियमित ठेवून पोटाचे आरोग्य जपता येईल.विण्यापूर्वी किमान ५ दिवस अगोदर दुधाळ गायींना ड जीवनसत्त्व तोंडावाटे किंवा विण्यापूर्वी ७ दिवस अगोदर इंजेक्शनद्वारे दिल्यास संक्रमण कालावधीमध्ये होणारी कॅल्शिअम कमतरता टाळता येते.कॅल्शिअम जेल द्रावण दुधाळ जनावरांना विण्यापूर्वी १२-२४ तास आणि व्यायल्यानंतर २४ तासांपर्यंत १२ तासाच्या अंतराने दिल्यास जनावरांतील कॅल्शिअम कमतरता टाळता येते.रक्तातील कॅल्शिअम कमी होण्याची कारणेगाभण काळाच्या अंतिम टप्प्यात तसेच व्यायल्यानंतर दुग्धोत्पादनासाठी जनावरांत अधिक कॅल्शिअमची गरज.आहारातील कॅल्शिअमचे कमी प्रमाण.आहारातील कॅल्शिअम आणि स्फुरदाचे अयोग्य प्रमाण (२:१ योग्य प्रमाण) तसेच आहारात ड जीवनसत्त्व कमतरता.वाढत्या वयाबरोबर आतड्यातून कॅल्शिअम शोषणाचे प्रमाण घटणे.जनावर विण्यापूर्वी गाभण काळात आहारात अधिक कॅल्शिअम प्रमाण असणे.शरीरात प्याराथारमोन संप्रेरकची कमतरता तर कॅल्सीटोनीन संप्रेरकाचे अधिक प्रमाण.आहारात मॅग्नेशिअम तसेच ऑक्झालेटचे प्रमाण अधिक असणे.विण्याच्या जवळपास किंवा व्यायल्यानंतर दुधाळ जनावराची ४८ तासापेक्षा जास्त वेळ उपासमार होणे किंवा बद्धकोष्ठता होणे.दुधाळ जनावराच्या शरीरावर विण्याच्या सुमारास ताण पडणे.- डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३(साहाय्यक प्राध्यापक, चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ ,जि.सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.