Nandurbar News : शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाले, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. शेतात पाणी साचल्याने शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अतिपावसामुळे नाले-रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प होत आहे. नवापूर शहरातील रस्ते वाहून जात आहेत..नवापूर तालुक्यात सततच्या मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. सततच्या पावसामुळे सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ झाले आहे. पावसामुळे नदी–नाले तुडुंब भरून वाहू लागले, तसेच ओढ्यांना पूर आला आहे..रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळित होत आहे. ग्रामीण भागातील अनेक घरांत पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांना सूर्याची ऊर्जा मिळत नसल्याने पिकांची वाढ खुंटते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे..Heavy Rain : सिंधुदुर्गात जोरदार पाऊस.आमलाण (ता. नवापूर) गावात तीन घरे पाण्याखाली गेली असून, फत्तीबाई वसावे आणि राकेश वसावे यांच्या घरातील साहित्य पाण्यामुळे खराब झाले आहे. घराजवळील नाल्याची संरक्षण भिंत कमी उंचीची असल्याने पाणी थेट घरात घुसले, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी संरक्षण भिंत उंच करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे..तालुक्यातील रस्त्यांवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. उमराण–नवापूर रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने तब्बल दोन तास वाहतूक ठप्प राहिली. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी स्वतःहून वाहने थांबविली होती. पाणी ओसरल्यानंतरच रस्त्यावरची वाहतूक सुरळीत झाली..Nanded Heavy Rain : नांदेडला सलग तिसऱ्या दिवशी पाच महसूल मंडलांत अतिवृष्टी.नवापूर शहरातून वाहणाऱ्या नाल्याकाठी असलेल्या घरांत पाणी शिरते, तसेच प्रभाकर कॉलनी, इस्लामपुरा या भागात दरवर्षीप्रमाणे घरांत पाणी घुसल्याने अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. भात, ऊस, मका आणि कपाशी ही मुख्य पिके पाण्यात बुडाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेती पूर्णपणे जलमय झाली आहेत..अतिवृष्टीमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत अनावश्यक बाहेर न पडणे आणि नदी–नाल्यांच्या प्रवाहाजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.