Amaravati News : पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून व शेतीतज्ज्ञांकडून फवारणीचे सल्ले दिले जात असले तरी फवारणीसाठीही वेळ मिळत नसल्याने मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर, धान, मका, ज्वारी या पिकांचे आरोग्यही आता बिघडू लागले आहे. जिल्ह्यातील ३२ महसूल मंडलांत शंभर टक्क्यांवर पाऊस झाला असून सध्याही पावसाची रिपरिप सुरूच आहे..यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने मॉन्सूनपूर्व पेरणीची परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागांत पेरण्या मे महिन्यातच झाल्या. तर जून व जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत उर्वरित पेरण्या आटोपल्या. जिल्ह्यात पेरणीयोग्य एकूण सरासरी क्षेत्राच्या ९९ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली आहे. .मूग व उदीड काढणीवर असून काही भागांतील सोयाबीनही हाती येण्याची स्थिती आहे. बहुतांश भागातील सोयाबीनच्या शेंगा परिपक्वतेच्या अवस्थेत असताना सतत पावसाने त्यावर मारा करीत आरोग्य बिघडवले आहे. सोयाबीनवरील हंगामातील अखेरची फवारणी आटोपल्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने फवारणीचा खर्च वाया जाण्यासोबतच रोगांचे आक्रमण होऊ लागले आहे..Kharif Crop Damage : अमरावतीत यंदाचा खरीप हंगाम रोगग्रस्त.सखल भागातील शेतांमध्ये पाणी साचून असल्याने पिके खराब होऊ लागली आहेत. येलो मोझॅकसह चक्रिभुंग्याचे आक्रमण झाले आहे. जुलै व ऑगस्टमधील अतिवष्टीने ५१ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ६८७ मिमी पाऊस झाला असून त्याचे प्रमाण अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत सरासरी ८६ टक्के आहे. पावसाची तूट दिसत असली तरी.३२ महसूल मंडलांत पावसाने १०० टक्क्यांवर सरासरी गाठली आहे. कापूस व तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. सोयाबीनच्या परिपक्व झालेल्या शेंगांना अंकूर फुटू लागले आहेत..Crop Damage: राज्यातील पीक नुकसानीकडे गांभीर्याने पाहा : शरद पवार.खरिपाची स्थितीएकूण पेरणी क्षेत्र ः ६,८२,९९२ हेक्टरप्रत्यक्षात पेरणी ः ६,७६,१६२ हेक्टरजुलै व ऑगस्टमधील बाधित क्षेत्र ः ५१,७१९ हेक्टररोगांचे आक्रमण झालेले पीक ः मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर, धान, मका, ज्वारी.सोयाबीन धोक्यातसोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे. त्यामध्ये पावसामुळे आर्द्रता अधिक राहणार आहे. २५ ते ३० टक्के आर्द्रता राहणार असल्याने बाजारात या पिकास खरेदी करण्यासाठी पसंती मिळणार नाही. भाव कमी राहणार आहे. सद्यःस्थितीत चार हजारांच्या जवळपास दर आहे. पावसामुळे शेंगा खराब होण्यासोबतच पाऊस थांबल्यावर दाण्यांचा आकार बारीक होण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनला भाव मिळेल, अशी शक्यता खरेदीदारांनी वर्तविली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.