Akola News : यंदाच्या खरिपात कपाशी पिकावर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. लागवडीपासूनच सुरू झालेल्या संकटांच्या फेऱ्यांमुळे कपाशीच्या वाढीवर तसेच गुणवत्तेवर गंभीर परिणाम झाला आहे. सध्या सुरू झालेल्या पहिल्या वेचणीमध्ये बहुतांश कापूस खराब निघत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे..सततच्या पावसामुळे कपाशीची झाडे पुरेशा उंचीची वाढलेली नाहीत. सलग पावसामुळे शेंड्यावरील फूल, पात्या गळून पडल्या. आता हवामानात उघाड पडताच वेचणी सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांच्या हाती येणारा कापूस कवळी आणि काळवंडलेला आहे. .Rain Crop Damage : पावसाने खानदेशात हानी.खालील भागातील बोंड्या फुटू लागल्याने त्यातील कापूस काळसर झाला आहे. या खराब कापसाचे प्रमाण सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वेचणीसाठीही मजुरीचा मोठा खर्च येत आहे. सध्या एका मजुराला २०० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. .दिवसभरात मजूर केवळ ८ ते १० किलो कापूस वेचू शकतात. हा कापूस घरी आणल्यानंतर पुन्हा उन्हात सुकवावा लागतो. कारण पावसामुळे ओलावा जास्त आहे. कापसाच्या ओलाव्यामुळे वजन वाढत असले तरी गुणवत्तेत मोठी घसरण झाली आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे संंकटांचा डोंगर.कपाशीतील कवळीचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर गेले आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात ४० ते ५० टक्के कापूस कवळीयुक्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात या कापसाला योग्य दर मिळत नाही. सध्या बाजारात पहिल्या हप्त्यातील कापूस येऊ लागला आहे; मात्र व्यापाऱ्यांकडून या कापसाला कमी दर दिला जातो. गुणवत्तेत घट झाल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे..पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत मिळून सुमारे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. हवामानाने साथ दिली असती, तर या हंगामात चांगले उत्पन्न मिळाले असते..मात्र, वारंवारच्या पावसाने संपूर्ण हंगाम बिघडवून टाकला. काही ठिकाणी पाणी साचल्याने झाडे सडली, तर काही ठिकाणी कीड व बुरशीचा प्रादुर्भाव वाढला. आता शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे या खराब झालेल्या कापसाची विक्री कशी करायची, याचे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.