Parbhani News : जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे २१५ विहिरींचे नुकसान झाले आहे. त्यात पाच तालुक्यांतील ८० विहिरी पूर्णपणे खचल्या आहेत तर आठ तालुक्यांतील १३५ विहिरींचे अंशतः नुकसान झाले आहे. .अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळ जमा झाल्यामुळे बुजल्या आहेत, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील ५२ मंडलांत जून ते सप्टेंबर (मॉन्सून कालावधी) २ ते ५ वेळा अतिवृष्टी झाली. गोदावरी, पूर्णा, दूधना, करपरा, गळाटी आदी नद्या, उपनद्या, ओढे, नाल्यांना पूर आले..जायकवाडी, माजलगाव या धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला. अनेक मंडलांत २ ते ३ तासांच्या कालावधीत २०० मिमीहून अधिक पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे जमिनी खरडून गेल्या. .Crop Damage Compensation : सप्टेंबरमधील पीकनुकसानीपोटी ६४ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरणास मंजुरी .शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे अतोनात नुकसान झाले. पूर, बॅक वॉटरमुळे विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणार गाळ जमा झाल्यामुळे बुजल्या आहेत. बांधकाम केलेल्या तसेच न केलेल्या विहिरी पूर्णपणे खचल्या आहेत. नदी-नाल्याकाठच्या अनेक गावांतील विहिरींचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. .Crop Damage : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत २० लाखांवर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान.विहिरींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सिंचन, पशुधनासह पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मनरेगाअंतर्गत खचलेल्या, बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांकरिता ३० हजार रुपयांच्या मर्यादेत अर्थसाह्य देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.