Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यात यंदा खरिपातील एकूण २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर प्राथमिक क्षेत्रापैकी सुमारे २० लाख ४९ हजार ४१७ हेक्टरवरच खरिपाची पेरणी झाली. म्हणजे सुमारे ९२ हजार ६०५.५४ हेक्टर क्षेत्र पेरणी येणार आहे त्यात नैसर्गिक आपत्तीने सुमारे साडेचार लाख हेक्टरला दणका दिला आहे. शिवाय विविध भागातील या नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या पिकांची अनेक ठिकाणी स्थिती ही बिकटच आहे..मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा लाख ८१ हजार ९०३ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे सहा लाख ६४ हजार २८३ हेक्टर वर खरिपाची पेरणी झाली. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत या जिल्ह्यातील १७६२० हेक्टर क्षेत्र पेरणी विना राहिले. जालना जिल्ह्यातील सरासरी ६ लाख ५१ हजार १७३.८४ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ६ लाख २५ हजार ६५१ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. या जिल्ह्यातील २५ हजार ५२२ हेक्टर क्षेत्र पेरणी विना राहीले..Kahrif Sowing : मराठवाड्याच्या दोन जिल्ह्यांत २६,६३३ हेक्टरवर पेरणी.बीड जिल्ह्यातील ८ लाख ८ हजार ९४५ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ७ लाख ५९ हजार ४८३ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. या जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक ४९ हजार ४६२ हेक्टर क्षेत्र पेरणी विना राहीले. पेरणी विना राहिलेले क्षेत्र व त्यात नैसर्गिक आपत्तीचा दणका यामुळे यंदाच्या खरिपात उत्पादन घटनाार हे निश्चित मानल्या जात आहे..नैसर्गिक आपत्तीचा आघात ....माहितीनुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचा प्राथमिक नजर अंदाज आकडा मंगळवारपर्यंत (ता. १६) सुमारे ४ लाख ५८ हजार ५११ हेक्टरवर पोहोचला होता. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव या तालुक्यातील २६५ गावातील १ लाख २९ हजार ३४ शेतकऱ्यांच्या सुमारे ९९ हजार ५०७ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले. .Crop Damage: पुणे जिल्ह्यात खरीप पिकांच्या नुकसानीत वाढ.यामध्ये सुमारे ७१ हजार ४५६ हेक्टरवरील क्षेत्राचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त तर २८ हजार ५१ हेक्टरवरील शेती पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जालना जिल्ह्यात जालना,अंबड, घनसावंगी तालुक्यातील ९१ हजार १८६ शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. .हे सर्व नुकसान ३३ टक्यांपेक्षा जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बीड जिल्ह्यातील ९७९ गावातील ४ लाख २६ हजार ४०३ शेतकऱ्यांच्या सुमारे २ लाख ६७ हजार ८१८ हेक्टरवरील शेती पिकाला नैसर्गिक आपत्तीचा दणका बसला आहे. .नुकसान झालेल्या या क्षेत्रात सुमारे २ लाख ५६ हजार ३६२ हेक्टरवरील शेती पिकाचे ३३ टक्यांपेक्षा जास्त तर ११ हजार ४५६ हेक्टरवरील शेती पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे काही तालुक्यातील नुकसानीच क्षेत्र कळणे अजून बाकी होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.