Jalgaon News : जिल्ह्यात सोमवारी (ता. १५) व मंगळवारी (ता.१६) झालेल्या पावसात जामनेर, पाचोरा, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यास झोडपले. यात जमिनी खरडल्या. पशुधन मृत्युमुखी पडले असून, शेतीची मोठी हानी झाली आहे. .चार तालुक्यांत जिल्ह्यात सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्टरवरील कापूस, केळी, पपई, सोयाबीन व अन्य फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ५०० पेक्षा अधिक घरगोठ्यांची पडझड झाली आहे..Rain Crop Damage : अमरावती जिल्ह्यात ५१ हजार हेक्टरवरील पिके नष्ट.पाचोरा तालुक्यातील सारवे, सातगाव डोंगरी, शिंदाड, जामनेरातील नेरी बुद्रुक, पिंप्रीसह आठ गावांना मोठा फटका बसला आहे. मुक्ताईनगरातील १५ व बोदवडमधील सुमारे १३ गावांत मोठी हानी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली गेली आहे. पिके पुरती हातची गेली असल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे..वाघूरसा पूर आल्याने नुकसानवाघूर नदीला महापूर आला. नदीकाठच्या अनेक गोठ्यांसह शेतीत पाणी शिरले. यात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जामनेर व पाचोरा तालुक्यानजीक छत्रपती संभाजीनगरातील अजिंठा व सातमाळा डोंगररांगा आहेत. .Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी.या भागात सलग दोन दिवस अतिजोरदार पाऊस झाला. यात नद्या, नाल्यांना मोठा पूर आला. अतिपावसाने जमिनी खरडल्या आहेत. शेतांमधील माती वाहून गेल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना जामनेर, पाचोरा भागात सहन करावे लागले आहे..मंत्र्यांची पाहणीमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी (ता. १६) पाचोरा, जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तातडीने पंचनामे व तत्काळ मदत कशी करता येईल, याबाबत सूचना देण्यात आल्या. पाचोरा तालुक्यात मोठी हानी झाली आहे. सुमारे ८० पेक्षा अधिकचे पशुधन मृत्युमुखी पडले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.