Nagpur News : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. याचा फटका शेतशिवारासह अनेक गावांना देखील बसला असून पिकासोबतच घर, गोठे देखील क्षतीग्रस्त झाले आहेत. पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. .विदर्भात गुरुवार (ता. २८) पासून पावसाच्या कोसळधारा सुरू आहे. शुक्रवारी (ता. २९) ही अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यात काळी दौलत खान, कोसोळा, घोनसरा महसूल मंडलात झालेल्या पावसाने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. .Rain Crop Damage : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान.साई इजारा येथे वीज कोसळून चार शेळ्याचा मृत्यू झाला. सेवादास नगर वडद येथे रासायनिक खतांची पोती वाहून नेणारा ट्रॅक्टर शिप नदीमध्ये वाहून गेला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. चरण्यासाठी अनेकांनी आपली जनावरे रानात सोडली होती. पावसाला सुरुवात होताच भीतीपोटी अनेक गुराखी गावाकडे परतले मात्र जनावरे बेपत्ता असल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे..Crop Damage Survey : सोलापूर जिल्ह्यात ६० टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण.गेल्या २४ तासांतील जिल्हानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)अकोला ५२.९अमरावती १भंडारा २३बुलडाणा ५ब्रम्हपुरी २९.८चंद्रपूर १०गडचिरोली ३.४गोंदिया ३५.८नागपूर ०.८वर्धा ०वाशीम ६.४यवतमाळ १०वीज पडून एक ठारयवतमाळच्या डेहणी (ता. दिग्रस) येथे रमेश सोना चव्हाण (वय ५५) यांचा अंगावर वीज कोसळून शुक्रवारी मृत्यू झाला आहे..यवतमाळ जिल्ह्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी पीक खरडून गेले तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्याचे नुकसान झाले. याची भरपाई कोणतेही निकष किंवा मर्यादेविना करावी, अशी शासनाला मागणी आहे.- मनीष जाधव, प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.