Sindhudurg News : जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून समुद्रात वादळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंदर विभागाने तीन नंबरचा बावटा लावीत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे..जिल्हयात मुसळधार पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभर झोडपून काढल्यानंतर रात्री देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. आज (ता. ३०)पहाटेपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. जिल्ह्याच्या सर्व भागात संततधार पाऊस सुरू आहे. .Heavy Rain : अकोला जिल्ह्यात पावसाने पुन्हा उडवली दाणादाण.वैभववाडी, कुडाळ, देवगड, मालवण, सावंतवाडी या तालुक्यांना पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले आहे. याशिवाय कणकवली, वेंगुर्ला, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकीकडे जोरदार पाऊस पडत असताना समुद्रात देखील वादळी स्थिती निर्माण झाली आहे. .Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ११ मंडलात अतिवृष्टी.प्रतिताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बंदर विभागाने वादळाच्या शक्यतेने तीन नंबरचा लाल बावटा लावीत मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. .जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे. २ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट दिला आहे. मुसळधार पावसाचा परिणाम सुरू असलेल्या गणेशोत्सवावर देखील झाला आहे.तालुकानिहाय पाऊसदेवगड-७५ मि.मी, मालवण-६४ मि.मी, सावंतवाडी-५५ मि.मी, वेंगुर्ला-४० मि.मी, कणकवली-४२ मि.मी, कुडाळ-७३.मि.मी, वैभववाडी-६५ मि.मी, दोडामार्ग-४०मि.मी. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.