Heavy Rainfall: नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने दाणादाण
Crop Damage: नाशिक जिल्ह्यात सोमवारी (ता. २२) दुपारनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून पश्चिम पट्ट्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. खरिपाची पिके पाण्याखाली जात असून कांदा लागवडीस अडथळा निर्माण झाला आहे, तर काही गावांचा संपर्कही तुटला आहे.