Nanded News : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी अनेक गावांना भेटी दिल्या. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यांनी या दौऱ्यात केली. .नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला आणि परिसरात असलेल्या अनेक नाल्यानाही पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. काही भागात पशु ही दगावली आहेत. .Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका.अशा परिस्थितीत शेतकरी अथवा ग्रामस्थ हवालदिल होऊ नयेत, त्यांना मानसिक आधार दिला जावा यासाठी आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दगडगाव जवळा देशमुख, भेंडेगाव, पळशी आदी गावांना भेटी दिल्या. .Rain Crop Damage: नुकसान आणखी वाढणार; शेतकऱ्यांची मदतीची मागणी .यावेळी लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, लोहा तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, मंडल अधिकारी तानाजी सुगावे, मंडल कृषी अधिकारी दशरथ शिंदे, तलाठी भांगे, एडके, बोधगिरे, मंडळ सह कृषी अधिकारी रामगीलवाड, कृषी अधिकारी गजे सह कृषी अधिकारी अमोल साजने आदी उपस्थित होते..नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावेत. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त नागरिकांनाही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पंचनामे वेळेत सादर करावेत असे सूचना आ. बोंढारकर यांनी यावेळी तहसीलदार परळीकर यांना दिल्या आहेत. राज्य शासनाने झालेल्या अतिवृष्टीची दखल घेता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.