Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सुमारे ४५४ मंडलांत गुरुवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाचे हलकी मध्यम दमदार ते जोरदार हजेरी लागली. चार जिल्ह्यातील तब्बल ४८ मंडळात अतिवृष्टी झाली. लातूर, नांदेड जिल्ह्यात अनेक भागात पाऊस धो-धो बरसला. अतिवृष्टी झालेल्या भागात नदी नाल्यांना पूर येऊन अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली. .मध्यंतरी काही दिवस अधून मधून तुरळक बरसणाऱ्या पावसाचा गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात जोर वाढल्याची स्थिती आहे. लातूर नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडलांत पाऊस धो धो बरसला. लातूरमधील तब्बल २९ तर नांदेडमधील १७ व धाराशिव, जालन्यातील प्रत्येकी एका मंडलात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील कन्नड व फुलंब्री तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. .India Heavy Rain: देशभरात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, प्रशासन सतर्क.जालना जिल्ह्यातील बदनापूर, मंठा, परतूर, घनसांवगी व जालना तालुक्यात पावसाचा अनुक्रमे जोर होता. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, परळी, धारूर, शिरूर कासार, गेवराई, बीड तालुक्यांत पावसाचा जोर राहिला. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. इतर तालुक्यातही पाऊस धो-धो बरसला. .नांदेड जिल्ह्यातील नायगाव खु. तालुक्यांत सरासरी १०० मिलिमीटर पुढे तर बिलोली तालुक्यांत सरासरी ८५.१ मिलिमीटर, मुखेड ७१.४ मिलिमीटर पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६६, जालन्यातील ४४, बीड जिल्ह्यातील ७४, लातूर जिल्ह्यातील ६०, धाराशिव जिल्ह्यातील ४१, नांदेड जिल्ह्यातील ८७, परभणी जिल्ह्यातील ५२, तर हिंगोली जिल्ह्यातील २९ मंडलांत तुरळक, हलकी, मध्यम, दमदार ते जोरदार हजेरी लागली. दरम्यान छत्रपती संभाजीनगरसह इतरही जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी (ता. २८) दुपारी दोन वाजेपर्यंत पावसाचे अजून मधून कमी अधिक प्रमाणात बरसणे सुरू होते..Nanded Heavy Rain: नांदेडला पुन्हा मुसळधार पाऊस.अतिवृष्टीचे मंडळ (पाऊस मिलिमीटरमध्ये)जालना जिल्हाबावणे पांगरी ७२ .लातूर जिल्हालातूर ६६, हरंगुळ ७८.५०, कासारखेडा ६९.७५, कानेरी ७८.५०, लांमजणा ७२.५०, किनी १०२.७५, किल्लारी ७२.५०, अहमदपूर ६८.२५, खंडाळी ६८.२५, शिरूर ताजबद ७१.५०, हाडोळती ७१.५०, पानचिंचोली ६७, नीटूर ६६, मदनसुरी ६८.७५, उदगीर ८५.७५, नागलगाव ८९, वाढवणा ८४, नळगीर ७६.५०, मोघा ११०.७५, हेर ८१.५०, देवर्जन ८१.५०, तोंडार ८५.७५, रेनापुर ७६.७५, पानगाव ७१, देवणी ७०.७५, शिरूर अनंतमाळ ७०.२५, हिसामाबाद ९०.२५, जळकोट ७९.२५, घोन्सी ७६.५०.धाराशिव जिल्हामाकणी ६५.२५नांदेड जिल्हाबिलोली ११५, अदमापूर ६९.२५, लोहगाव ११५, रामतीर्थ १११.५०, मुखेड ६६.७५, जांब ८१.५०, येवती ६७.२५, चांडोळ ६६.७५, बाराळी ९६.५०, मुक्रमाबाद ७८.७५, कुरुला ८१.५०, दिग्रस बु. ८१.५०, बरबडा ९१, कुंटूर १०३.७५, नरसी ११५, नायगाव ११०.७५, मांजरम ११०.७५.जिल्हानिहाय सरासरी पाऊस (मिलीमीटरमध्ये)छत्रपती संभाजीनगर ५.४जालना १६बीड २५लातूर ६२.७धाराशिव २४.६नांदेड ४३.४परभणी २५.७हिंगोली १०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.