Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यात रविवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सरासरी २६.५ मिलिमीटर पाऊस झाला. अनेक भागांत पावसाचा धुमाकूळ सुरू होता. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत पावसाची सरासरी ६८ ते ७४ मिलिमीटर दरम्यान राहिली. .नांदेड जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. परभणी जिल्ह्यातील ४ व हिंगोली जिल्ह्यातील २२ मिळून एकूण २६ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोलीतील ५ मंडलांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. पावसामुळे जमीन खरडून गेल्याने माती, पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले..Heavy Rain: महाराष्ट्रात अनेक भागांत अतिवृष्टी; बळीराजा हवालदिल.सलग तिसऱ्या दिवशीही मराठवाड्यातील बहुतांश भागात त्याचा धुमाकूळ सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यात तब्बल २२५ मिमी पावसाची नोंद झाली. तर चारही जिल्ह्यांतील सुमारे १७ मंडलांत सरासरी १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पावसाचा लहरीपणा सातत्याने मराठवाड्यातील बहुतांश भागात अनुभवास येत आहे. मंडलागणिक पावसाचे असमान पडणे, अनेक भागात दांडी मारणे किंवा काही मंडलांत अति जास्त बरसून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरते आहे. .अति जास्त होणारा पाऊस शेती पिके पाण्याखाली आणत असून शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न नेस्तनाबूत होत असल्याची स्थिती आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ७४.३ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात ६८.४ मिमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये २७.१ मिमी, जालन्यात २३.७ मिमी, बीडमध्ये १२.६ मिमी, लातूरमध्ये ५.७ मिमी, धाराशिवमध्ये सरासरी ३.३ मिमी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील तब्बल २२ मंडलांत अतिवृष्टी झाली. .त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील १६, छत्रपती संभाजीनगरमधील ९ तर जालना जिल्ह्यातील २ मंडलांत अतिवृष्टी झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सरासरी ९२.५० मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ सिल्लोड तालुक्यात सरासरी ६३.३, कन्नडमध्ये ३४.४, खुलताबादमध्ये ३१.७, फुलंब्री २६.३, वैजापूर १७.४, छत्रपती संभाजीनगर १०.८, पैठण १०.८ तर गंगापूर तालुक्यात सरासरी ६.७ मिमी पावसाची नोंद झाली..Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसामुळे हाहाकार.जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडले (पाऊस मिमीमध्ये)छत्रपती संभाजीनगर जिल्हाअजिंठा ६६.५०, आमठाणा ६७.२५, बोरगाव ६७.२५, अंभई १०३.७५, उंडणगाव ६६, सोयगाव ११४.७५, सावलदबारा १२६.७५, बनोटी ८८.७५, जरंडी १०२.५०.जालना जिल्हाभोकरदन ६८.७५, पिंपळगाव ६५.नांदेड जिल्हातळणी ११४.२५, निवघा १०४.२५, पिंपरखेड १०८.२५,आष्टी १५८.२५, कीनी ९२.२५, बोधाडी ११५.२५, इस्लापूर १२२, जलधारा ९३.७५, शिवनी ८६.७५, मांडवा ८६.७५, सिंदगी २५५.५०, हिमायतनगर १५९.५०, सरसम १७३.७५, अर्धापूर ८३.७५, दाभड ६६.२५, मालेगाव ६८.हिंगोली जिल्हाहिंगोली ७७.५०, नरसी ६८.७५, सिरसम ६६.२५, बासंबा ७२, दिग्रस ७६.५०, माळहिवरा ६६.२५, खांबाळा ६६.२५, कळमनुरी १२२.५, वाकोडी १२२.५०, नंदापूर ११३.५०, आखाडा ९१.२५, वारंगा १०९.५०, वसमत ७८, आंबा ७८, हयातनगर ७८, हट्टा ६९, टेंभुर्णी ७८, कुरुंदा ७८, औंढा ८५.५०, येहळेगाव ११३.५०, साळणा ८५.५०, जवळा ८५.५०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.