Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील तब्बल ३२ मंडलांत पुन्हा एकदा अतिवृष्टीने दणका दिला आहे. बीड, धाराशिव, लातूर, परभणी,हिंगोली या जिल्ह्यातील मंडलांचा यामध्ये समावेश असून नदी नाले एक झाल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रकल्पांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने शेती पिकाचे नुकसान परिसीमा गाठत असल्याची स्थिती आहे..मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसानीचे चक्र थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात बीड जिल्ह्यातील सर्वाधिक १५ मंडळ अतिवृष्टी झाली. आजवर पावसाचा टक्का कमी असलेल्या आष्टी तालुक्यात या पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्यापाठोपाठ धाराशिव जिल्ह्यातील सात, परभणी व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी चार तर हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली. .Rain Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस मंडलांत अतिवृष्टी.पावसाचा जोर कायम असल्यामुळे पिकाचा बचाव करावा तरी कसा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे ६३ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ३६ मंडलांत तुरळक,हलका तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील तब्बल ६४ मंडलांत हलका मध्यम दमदार जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील आष्टी, केज, अंबाजोगाई, बीड, शिरूर कासार, तालुक्यात पावसाचा जोर अनुक्रमे अधिक होता. लातूर जिल्ह्यातील ५८ मंडलांत हलका मध्यम ते दमदार पाऊस झाला..Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका.लातूर जिल्ह्यातील उदगीर व लातूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. धाराशिव जिल्ह्यातील ३९ मंडलांत हलका मध्यम, दमदार पाऊस झाला जिल्ह्यातील धाराशिव,कळंब, परंडा,तुळजापूर तालुक्यात पावसाचा जोर अनुक्रमे अधिक होता. नांदेड जिल्ह्यातील सुमारे ७८ मंडलांत तुरळक, हलका तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. .परभणी जिल्ह्यातील ४९ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सकाळपर्यंत केवळ १२ मंडळाची पावसाची आकडेवारी प्राप्त झाली. त्या माहितीनुसार त्या माहितीनुसार काही मंडळात हलका, मध्यम तर काही मंडलात तुरळक पाऊस झाला..बीडमध्ये ४४ नागरिक अडकलेबीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या सहा गावांमध्ये एकूण ४४ नागरिक पूरस्थितीत अडकले आहेत. कडा (११), सोभा निमगाव (१४), घाटा पिंपरी (७), पिंपरखेड (६), धानोरा (३) आणि डोंगरगण (३) या गावांतील नागरिक अडकले असून, स्थानिक प्रशासनाने तत्काळ मदत मागवली आहे..अतिवृष्टीची मंडळ (पाऊस मिलिमीटरमध्ये)बीड जिल्हानाळवंडी ६७, नेकनुर ७०.२५, येळंबघाट ९९, कडा ६७, टाकळसिंग ६७, दौलावडगाव ८०.७५, धानोरा ९६.२५, पिंपळा ९१, दादेगाव ९६.२५, पाटोदा ८६.५०, लोखंडी सावरगाव ८६.५०, केज ७४.२५, युसुफ वडगाव ६६.२५, होळ ६८.७५, शिरूर १०४.२५.लातूर जिल्हासासारखेडा ७७, उदगीर ९३,मोघा ९३, तोंडार ९३,धाराशिव जिल्हाबेंबळी ७१.७५, पाडोळी ७१.७५, केशेगाव १०५, तुळजापूर ६९.२५ , अनाळा ६५.७५, ईटकुर ६५.७५, कळंब ६५.७५.परभणी जिल्हापरभणी ६५.५०, माखणी ६९.५०, बोरी ९४, दुधगाव ७५हिंगोली जिल्हावाकोडी ६६,डोंगरकडा ७९ .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.