Pune News: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाने चांगलेच धुमशान घातले आहे. राज्यातील तब्बल ४२४ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. मंगळवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक ३२० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली..मुंबईतही पावसाने हाहाकार उडाला आहे. राज्यातील ४६ हून अधिक धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने जीवित व वित्तहानी झाली आहे..Maharashtra Monsoon Rain: पाऊस आजही १६ जिल्ह्यांना दणका देणार; राज्यात पावसाचा जोर दोन दिवस कायम राहणार.कोकणात अतिवृष्टीमुंबई उपनगर भागात मागील चोवीस तासांमध्ये २३८.२ मिलिमीटर पाऊस झाला. तर ठाणे १३३, मुंबई शहर ११० मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे मुंबईत रेल्वे पाण्याखाली गेली असून विविध २४ ठिकाणी पाणी साचले होते. कोकणात सुमारे २१४ मंडलांत अतिवृष्टी झाली असून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांना ३.३ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीतील जगबुडी, शास्त्री, कोदवली, रायगडमधील कुंडलिका नदी, सिंधुदुर्गमधील गड नदी, वाघोटण या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलामध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील ५७ मंडलांत अतिवृष्टी झाली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील वेल्हा, पानशेत, विंझर या तीन मंडलांत २०८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे जवळपास भरली असून १८ हून अधिक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. मुळशी धरणक्षेत्रात जिल्ह्यातील सर्वाधिक २१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. .Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान.सातारा जिल्ह्यातील पाच मंडलांत, सांगलीतील चार मंडलांत, तर कोल्हापूरातील ३७ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. हा पाऊस भात पिकांसाठी पोषक ठरत आहे. परंतु अधिक पाऊस झाल्यास नुकसान होऊ शकते. घाटमाथ्यावर होत असलेल्या पावसामुळे कोयना, उजनी, राधानगरी, वारणा, भाटघर अशा २९ धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, नगर, नाशिक, खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून अधूनमधून तुरळक सरी बरसत आहेत..मराठवाड्यात जोर ओसरलामराठवाड्यात पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. या भागातील बीड, हिंगोली, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील अवघ्या पाच मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. मागील दोन दिवस नांदेड, परभणी, धाराशिव, वाशीम या भागांत पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. परंतु आता या भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे..विदर्भात कमी-अधिक पाऊसविदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तर इतर भागात पावसाचे कमी प्रमाण आहे. मागील चोवीस तासांमध्ये या भागातील १४७ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. बाघ, कन्हान, वैनगंगा, प्राणहिता या नद्या दुथडी भरून वाहत आहे..ताम्हिणी घाटमाथ्यावर ३२० मिलिमीटर पाऊसराज्यातील अनेक नद्यांना पूरस्थितीकोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणारविदर्भात जोरदार पावसाची शक्यता.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.