Latur / Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यांमध्ये बुधवारी (ता. २७) सायंकाळपासून जोरदार पाऊस पडत असून, लातूर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस होऊन सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. गुरुवारीही (ता. २८) पाऊस कायम असून संततधार सुरु आहे. लातूर जिल्ह्यात सकाळी आठ वाजता संपलेल्या मागील चोवीस तासात सुमारे ६२.८ मिलिमीटर पाऊस झाला असून साठपैकी तब्बल २९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. .धाराशिव जिल्ह्यात २७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अगोदरच पिके पाण्याखाली होती. या पावसाने त्यात आणखी भर पडली असून ही पिके आता हातची गेल्याचे शेतकरी सांगत आहेत..या पावसामुळे नद्यांना पाणी आले असून बंद केलेला मांजरा धरणाचा विसर्ग पुन्हा सहा दरवाजांद्वारे सुरू करण्यात आला आहे. पावसामुळे रेणा, खरोळा, जवळगा व तावरजा मध्यम प्रकल्प तुडुंब भरली असून, रेणा व तावरजा धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे. जिल्ह्यातील २७ साठवण तलावही पूर्ण क्षमतेने भरले आहे. धसवाडी (ता. अहमदपूर) येथील शतेकरी लक्ष्मण नामदेव गोजेगावकर यांची गाय नाल्यात आलेल्या पुरात वाहून जाऊन मयत झाली आहे. .Rain Crop Damage : पावसाचा २९ हजार हेक्टरला फटका .नदीकाठच्या गावे व शेतकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने सुमारे ३९ रस्त्यांवरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातील तालुक्यातील सर्व आठ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मोघा (ता. उदगीर) मंडळात सर्वाधिक ११०.८ मिलिमीटर, त्यानंतर किनी (ता. औसा) मंडळात १०२.८ व हिसामाबाद मंडळात ९०.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय लातूर जिल्ह्यातील पाऊस पुढील प्रमाणे आहे..लातूर - ६०, औसा - ५७.३, अहमदपूर - ६२.९, निलंगा - ५०, उदगीर - ८६.९, चाकूर - ५१.७, रेणापूर - ६४.९, देवणी - ५९.२, शिरूर अनंतपाळ- ७२.७, तर जळकोट तालुक्यात ७७.९ पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे शिवारात पाणी साचले असून ओढे, नदी व नाल्यांना मोठे पाणी आले आहे. अनेक भागांत हे पाणी रस्त्यावरील पुलावरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाला आहे. पिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे. काही भागात जमिनी खरडून केल्या आहेत. गुरुवारीही पावसाचा जोर कायम होता. यामुळे नुकसानीचा टक्का वाढण्याची शक्यता आहे..Crop Damage : भीमेच्या पुराने मंगळवेढ्यात पिकांचे नुकसान.उमरगा तालुक्यात सर्वाधिक पाऊसबुधवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातही पिकांच्या नुकसानीत भर पडली आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागांत शेतात साचलेली पाणी अजून बाहेर पडले नाही. यात गुरुवारच्या पावसाने भर टाकल्यामुळे पिके आणखी पाण्याखालीच राहणार असल्याने नुकसान अटळ आहे. .जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळी आठपर्यंत सरासरी २४.६ मिलिमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक ४५ मिलिमीटर पाऊस उमरगा तालुक्यात झाला आहे. त्यानंतर लोहारा तालुक्यात - ४१.३, कळंब - ३४.७, धाराशिव - २६.४, वाशी - २१.४, तुळजापूर - १४.९, भूम - १३.३ तर परांडा तालुक्यात सर्वांत कमी ९.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.