Latur News : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. २८) रात्री पावसाने जोरदार हजेरी लावत पिकांची वाटप लाावली. सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांत जिल्ह्यात पहिल्यांदाच सरासरी ९१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक पाऊस चाकूर तालुक्यात सुमारे १५२.४ मिलिमीटर झाला असून, साठपैकी ३९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. .बारा मंडळात दीडशे ते १७८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नदी व ओढ्यांना पूर आल्याने ६२ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून, विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची सुटका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकांनी केली. पावसाची शक्यता लक्षात घेता लष्कराला पाचारण केले असून, सैन्य दलाची एक तुकडी अहमदपूरमध्ये दाखल झाली आहे..दरम्यान, सलग झालेल्या या पावसाने मूग व उडीद हातचे गेले असून, फुलगळती मोठ्या प्रमाणात झाल्याने सोयाबीनसह सर्वच पिकांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता. २७) रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी ६२.८ मिलिमीटर पाऊस होऊन २९ मंडळांत अतिवृष्टी झाली होती. त्याहून अधिक पाऊस गुरुवारी रात्री झाला. सर्वाधिक पाऊस चाकूर तालुक्यात, तर औसा तालुक्यात सर्वांत कमी ३२ मिलिमीटर पाऊस झाला आहे..लातूर तालुक्यात ८१.२, अहमदपूर - १४५.२, निलंगा- ४५.२, उदगीर- १२३.६, रेणापूर- १०६.४, देवणी- ७५.८, शिरूर अनंतपाळ- १०२.५ तर जळकोट तालुक्यात ११२.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. औसा व निलंगा सोडले, तर जिल्ह्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पिके पाण्याखाली गेली आहेत. जमीन खरडून जाण्यानेही मोठे नुकसान झाले आहे. .हाळी (ता. उदगीर) येथील खाजामैनोद्दीन तांबोळी यांच्या गोठ्यात पाणी घुसून दोन गाभण म्हशी व देवणी जातीच्या एका गाईचा जागीच मृत्यू झाला. गुत्ती (ता. जळकोट) येथील हुलाजी केंद्रे यांच्या सुमारे ६०५ कोंबड्या पावसामुळे दगावल्या आहेत. शेळगी येथील पंढरीनाथ गुंडरे यांच्या गोठ्यावर वीज पडून दोन गाय, एक म्हैस व एक वासरू ठार झाले. एरंडी येथील चंद्रकांत कोल्हाळे यांच्या बैलाचाही वीज पडून मृत्यू झाला आहे. पाच कुटुंबांच्या घरांची पडझड झाली आहे. थोडगा येथे चार घरामध्ये पाणी घुसले असून, कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान.तिरू प्रकल्पातील पाण्याचा वेग वाढल्याने बेलसांगवी (ता. जळकोट) येथील नागरिकांचे लाळी येथे स्थलांत्तर करण्यात आले. हासरणी (ता. अहमदपूर) येथील चाळीस घरामध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालय व गावातील मंदिरात हलवण्यात आले आहे. चापोली (ता. चाकूर) येथील २२ घरामध्ये पाणी घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तीन कुटुंबांना जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले असून, स्थलांतरित नागरिकांची भोजन व निवासाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. .पाण्यात अडकलेल्या शिरूर अनंतपाळमधील आठ, काळेगावमधील एक व माकणी येथील एकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी पूरपरिस्थिती व नुकसानीचा आढावा घेऊन सूचना दिल्या..जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सैन्य दलाच्या तुकडीची मागणी केली होती. त्यानुसार ही तुकडी गुरुवारी रात्री अहमदपूरमध्ये दाखल झाली आहे. शुक्रवारीही (ता. २९) जिल्ह्यात मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्याने काही पुलावरून वाहत असलेले पाणी कमी होऊन वाहतूक पूर्ववत होण्यास सुरुवात झाली होती.\.Crop Damage Survey : सोलापूर जिल्ह्यात ६० टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण.पाण्याचा निचरा करून पीक वाचवलेचांडेश्वर व खोपेगाव (ता.लातूर) येथील काही शेतकऱ्यांच्या वांगी, गोबी व मिरची असलेल्या शेतामध्ये गुरुवारी पाणी घुसून तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे भाजीपाला पिके पाण्याखाली जाऊन नुकसान होणार होते. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी तातडीने धाव घेऊन भर पावसात जेसीबी लावून दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पाण्याला वाट करून दिली. यामुळे भाजीपाल्याचे जास्त प्रमाणात होणारे नुकसान टळले.तातडीने मदत केल्याबद्दल शेतकऱ्यांनी तहसीलदार तांदळे व प्रशासनाचे आभार मानले आहेत. दरम्यान, पाणी वाहत असलेल्या पुलावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शुक्रवारी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती..धाराशिव जिल्ह्यात पावसाची रिपरिपजिल्ह्यात गुरुवारी रात्री पावसाची रिपरिप सुरू होती. चोवीस तासांत १६.१ मिलिमीटर पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले. यामुळे मांजरा धरणातील पाणीपातळी वाढली व धरणातून चार दरवाजे आणखी उचलून विसर्ग वाढवण्यात आला. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. धाराशिव - १३, तुळजापूर- ६.६, परंडा - १७.९, भूम - १७.६, कळंब - २६, उमरगा - १४.१, लोहारा - १०.५, वाशी -३३.७..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.