Jalgaon News : खानदेशात सध्या कापूस, उडीद, मूग, केळी, पपई काढणीचा हंगाम सुरू आहे. कलिंगड पीकही आहे. परंतु या पिकांना अति पावसाने फटका बसला आहे. खानदेशात पावसाचा जोर वाढल्यास, नुकसान पातळी आणखी वाढेल, अशी स्थिती आहे. .पाऊस रोज नको, काही तास निरभ्र वातावरण हवे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वहंगामी कापूस पिकात बोंडे उमलू लागतील, अशी स्थिती आहे. त्यात वेचणीही काही भागात किंवा हलक्या, मध्यम जमिनीच्या क्षेत्रात नवरात्रोत्सवात सुरू होईल. अशात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्यास नुकसान वाढेल. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत..Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका.पावसाची तूट मागील काही दिवसांतील जोरदार पावसाने अनेक भागांत भरून निघाली आहे. खानदेशात अनेर, तापी, गिरणा, बोरी, अंजनी आदी प्रमुख नद्या, प्रकल्पांत पाणी पाणी आहे. दुसरीकडे खरीप हंगामावर अतिवृष्टीचे सावट आहे. खानदेशात अनेक भागांत अति पावसाने पिके हातची गेली आहेत. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जात आहे. .मध्यंतरी खानदेशात पाऊस अपवाद वगळता नव्हता. शेतीकामे सुरू होती. फवारणी, केळी, पपईची काढणी, तणनियंत्रण व अन्य कामे गती घेत होती. पण पावसाचे रदार पुनरागमन नुकसानीचे ठरल्याचे अनेक भागातील पूरस्थिती, पीकहानीमुळे दिसत आहे. पाऊस यायला हवा, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण अतिजोरदार पावसाने जळगावातील पारोळा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, जामनेर, रावेर, भुसावळ आदी भागांत मोठी हानी झाली आहे..Rain Crop Damage: नुकसान आणखी वाढणार; शेतकऱ्यांची मदतीची मागणी .पावसाची तूट भरून निघतेयखानदेशात धुळे, जळगाव व नंदुरबारात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जळगावचे एकूण पाऊसमान ६३२ मिलिमीटर आहे. जिल्ह्यात पावसाची तूट कायम आहे. धुळ्याचे एकूण पाऊसमान ५६५ मिलिमीटर असून, धुळ्यातही पाऊसमान कमी आहे..जुलैत पावसाची तूट धुळ्यात होती. नंदुरबारचे पाऊसमान ८५४ मिलिमीटर आहे. नंदुरबारात जून व जुलैत पावसाची तूट होती. आता पाऊस जोरात आला. यामुळे पावसाची तूट भरत असल्याचे दिसत आहे. पण नुकसानही वाढत आहे. काही दिवसांत मोठा पाऊस झाल्याने शेती, घरगोठे व पशुधनाची हानी झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.