Jalgaon News : खानदेशात शनिवारी (ता. २७) रात्री व रविवारी (ता. २८) सकाळी झालेल्या अतिपावसात सुमारे १२५ गावांत घरगोठे व शेती, पीकहानी झाली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.सोयाबीन, मका, केळी, पपई, बाजरी, कांदा, भाजीपाला पिकांची मोठी नासाडी झाली आहे. सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, पशुधनाची हानी झाली आहे. .अनेक दिवसांनी जोरदार कोसळलाखानदेशात मागील आठ ते दहा दिवस पाऊस अपवाद वगळता नव्हता. पण शनिवारी जोरदार पाऊस सर्वत्र झाला. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, जामनेर, चोपडा, जळगाव, पारोळा, धरणगाव, यावल, रावेर, अमळनेर तालुक्यात, धुळ्यात धुळे, शिरपूर, साक्री भागात, नंदुरबार जिल्ह्यात शहादा, तळोदा, नवापूर, नंदुरबार या भागात सुमारे २८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अनेक भागात ४० मिलिमिटर पेक्षा अधिक पाऊस झाला. .Crop Damage Survey : ढोल-डफ वाजवित केले अधिकाऱ्यांचे स्वागत.अनेक मंडलांत अतिवृष्टी..जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे, पातोंडा भागात अतिवृष्टी झाली. धरणगाव तालुक्यातील सोनवद, चांदसर मंडळात अतिवृष्टी झाली. .Pomegranate Crop Damage : सांगली जिल्ह्यात डाळिंबाचे नुकसान.जळगाव तालुक्यातील म्हसावद, कानळदा मंडळात ६१ मिलिमिटर पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात ६३ मिलिमिटर पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यात ६७ मिलिमिटर पाऊस झाला..दृष्टिक्षेप...जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर बोरी, मन्याड, अंजनी, हिवरा, बहुळा, मोर, गूळ, धुळ्यात पांझरा, अनेर, बुराई, तर नंदुरबार जिल्ह्यात दरा, चिरडे, देहली सिंचन प्रकल्पातून मोठा विसर्ग.गिरणा, बहुळा, कांग, पांझरा, अनेर, मोर, उदय आदी नंद्याना पूर.जमिनी खरडल्याने मोठी हानी.शेती कामे ठप्प, सोयाबीन पीक हातचे जाण्याची भीती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.