Ahilyanagar News : आठ दिवसानंतर पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांना जोरदार पावसाने झोडपले आहे. तीन तालुक्यांत मिळून सुमारे २२ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे कापूस, कांद्यासह खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली..जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी तालुक्यांत मागील आठवड्यामध्ये प्रचंड पाऊस झाला होता. या जोरदार पावसाने पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी झोडपले आहे. शनिवारी (ता. २३) रात्रभर अनेक भागात पावसाचा धुमाकूळ सुरू होता. .प्रशासनाने दिलेल्या नोंदीनुसार अकोला, खरवंडी, मिरी, कोरडगाव, टाकळी, माणिकदौंडी, पाथर्डी, मुंगी, दहिगाव ने, एरंडगाव, ढोर जळगाव, चापडगाव, बोधेगाव, भातकुडगाव, शेवगाव, अरणगाव, कोरेगाव, खेड, वालवड , माही, राशीन, कर्जत या २२ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. .Rain Crop Damage : अतिवृष्टी, पुराने सांगलीत ७ कोटींचे नुकसान.पंधरा दिवसांत सलग दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेवगाव, कर्जत आणि पाथर्डी तालुक्यांतील बहुतांश भागात खरिपातील कांदा, कापूस, सोयाबीन, तूर आणि बाजरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. .Rain Crop Damage : सातारा जिल्ह्यात पावसाने तीन कोटी २३ लाखांचे नुकसान.कर्जत तालुक्यातील राशीने येथे चोवीस तासांत सर्वाधिक १४२ मिलिमीटरची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे अनेक भागात कापसाच्या शेतामध्ये तीन ते चार फूट पाणी साचलेले होते. शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांतील अनेक भागात नद्यांना पूर आल्यामुळे रस्त्याचीही हानी झाली आहे..मंडलनिहाय २४ तासांतील पावसाची नोंद (मिलिमीटर)टाकळीभान : ४९, कारेगाव : ४९, बेलापूर : ४७, ब्राह्मणी : ४०, देडगाव : ४९, वडाळा : ५२, सोनई : ४४, कुकाणा : ४९, नेवासे : ४७, नेवासा खुर्द : ५२, अकोला : ८६, खरवंडी : ८७, मिरी : ६६, तिसगाव : ५५,करंजी : ४७, कोरडगाव : ८६, टाकळी : ८७, माणिकदौंडी : ६७, पाथर्डी : ६७, मुंगी : ८८, दहिगाव ने : ८०, एरंडगाव : ८०, ढोर जळगाव :६७, चापडगाव : १०२, बोधेगाव : १०२, भातकुडगाव : ५७, शेवगाव : ७३, पाटोदा : ४३, अरणगाव : ६८, कोरेगाव : ७९, खेड : ४९, वालवड : ७९, कळधरण : ४४, माही : ६८, मिरजगाव ; ४५, कोंभळी : ४५, भांबोरा : ४९, राशीन : १४२, कर्जत : ७९, जेऊर : ४२, नागापूर : ४५, केडगाव : ४१, कापूरवाडी : ४०..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.