Parbhani News: परभणी व हिंगोली जिल्ह्यांना शुक्रवारी (ता. १२) मुसळधार पावसाने झोडपले. शनिवारी (ता.१३) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये ८२ मंडलांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. या दोन जिल्ह्यांतील ६ तालुक्यांतील १८ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून ३ मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. मुसळधार पावसाने झोडपल्याने सोयाबीन, कपाशी, तूर यांसह फळेभाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे..हिंगोली जिल्ह्यात गुंडा (ता.वसमत) येथील ओढ्याच्या पुरामध्ये वाहून दोन महिलांचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातील कौडगाव (ता.पूर्णा) येथे थुना नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या ४ व्यक्तींची सुटका करण्यात आली..Monsoon Rain Alert: राज्यात २ दिवस मुसळधारेची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यात ३ दिवस जोरदार पावसाचा अंदाज.परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांत पाऊस झाला असला, तरी परभणी, पालम, पूर्णा तालुक्यामध्ये पावसाचा जोर राहिला. मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ३५.८ मिमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात आजवर सरासरी ६७.९ मिमी, तर यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ६३७.८ मिमी (९५.८ टक्के) पाऊस झाला..कौडगाव (ता. पूर्णा) शिवारात थुना नदीमध्ये पुरामध्ये अडकलेल्या ४ व्यक्तींची पूर्णा व परभणी रेस्क्यू टीमने सुखरूप सुटका केल्याचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांत पाऊस झाला. कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांत जोरदार पाऊस झाला..Maharashtra Rain Forecast: राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज.जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये सरासरी ४३.३ मिमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात आजवर सरासरी ९६ मिमी, तर यंदा एक जूनपासून आजवर सरासरी ८१८.२ मिमी (११५.६ टक्के) पाऊस झाला. गुंडा (ता.वसमत) येथे शुक्रवारी (ता.१२) शेतातून घराकडे परतत असताना ओढ्याच्या पुरात वाहून सखूबाई भालेराव (वय ५५), गयाबाई सारोळे (वय ६०) यांचा मृत्यू झाल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले..अतिवृष्टी झालेली मंडळे (पाऊस मिमीमध्ये) :परभणी जिल्हा : परभणी ग्रामीण ९५, सिंगणापूर ६५.५, पिंगळी ९५, पालम ७९.८, बनवस ७५.८, पेठशिवणी ८९.३, पूर्णा १३९, ताडकळस ९६.३, कात्नेश्वर १४७.५.हिंगोली जिल्हा : नांदापूर ६७.८, वसमत ६६.५, हयातनगर ८०.५, हट्टा १४५.५, टेंभुर्णी ७१.५, औंढा नागनाथ ७४, येळेगाव ६६.३, साळणा ७२.३, जवळा बाजार ७४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.