Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्व भागात रविवारी (ता.२१) रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने सीना, खैरी, ढोरा, नंदिनी नद्यांना पूर आला आहे. पुराने अनेक गावे आपत्तिग्रस्त झाली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे..चोवीस तासांत ५० महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाला. त्यातील सहा तालुक्यांतील २२ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. पाथर्डीतील टाकळी व खरवंडी मंडलांत प्रत्येकी १५५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाऊस थांबत नसल्याने मोठे संकट शेतकऱ्यांवर आले आहे..Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच.अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील जामखेड, पाथर्डी, शेवगाव, कर्जतसह श्रीगोंदा, अहिल्यानगर तालुक्यांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारी (ता. २१) रात्री सुरू झालेल्या मुसळधार पाऊस सोमवारी (ता. २२) सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होता. अति पावसाने आपत्तीत भर पडत आहे..जामखेड तालुक्यातील रात्रभर जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे खैरी नदीला पूर आला आहे. खैरी नदीतून धरणातून ११ हजार ७४५ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू होता. त्यामुळे वंजारवाडी, तरडगाव, सोनगाव, धनेगाव, चिंचपूर, पांढरेवाडीसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे..Heavy Rain Satara : खटावमध्ये ढगफुटीसदृश पाऊस .नदीकाठच्या शेतात, घरात पाणी घुसल्याने प्रचंड हानी झाली आहे. जामखेड शहरातील धाकटी नदीला पूर आल्याने नागेश्वर मंदिरात जाण्यासाठीचा पूल तुटला. दरडवाडी येथे पूल तुटला. सीना नदीला गेल्या चार दिवसांपासून पूरस्थिती आहे. सोमवारी सीना नदीतून ९ हजार १३५ क्युसेकने पाणी वाहत होते..पाथर्डी तालुक्यातील घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांतील नद्यांना पूर आले आहेत. मोहटादेवी गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी असल्याने भाविकांनी गडाकडे येऊ नये असे आवाहन केले. वरूर-भुगरूमधील ढोरा नदीला यंदा तिसऱ्यांदा मोठा पूर आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.