Ahilyanagar News : जिल्ह्याच्या दक्षिण भागात आठ दिवसांत पावसाने अक्षरशः मुसळधार, अति मुसळधार पावसाने खरिपाचे पुरते वाटोळे केले आहे. सप्टेंबर महिन्यातील १४ तारखेपासून २३ तारखेपर्यंत सुमारे ६० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे..त्यातील २७ मंडलांत एकदा, २० मंडलांत दोनदा, ९ मंडळात तीनदा तर पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी, खरवंडी या चार मंडळात पाच वेळा अतीवृष्टी झाली. यातील टाकळी मंडळात चोवीस तासात सर्वाधिक १५५ मिलीमीटर, चापडगाव व भातकुडगाव मंडळात प्रत्येकी १४८ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला..Crop Damage Compensation : दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न असेल.दक्षिण भागातील कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, अहिल्यानगर, नेवासा, श्रीगोंदा या तालुक्यात मुसळधार, अति मुसळधार पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यातील १४ तारखेपासून २३ तारखेपर्यत आठ दिवसात अधिक पाऊस झाला. पाऊस, पुराने नदीकाठची शेती वाहुन गेली. पाणी साठून राहिल्याने पिके वाया गेली..Crop Damage Compensation : हिंगोली जिल्ह्यासाठी २३५ कोटी मंजूर.तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक खरिपातील क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्ह्यातील १२४ महसुल मंडळापैकी सुमारे ६० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सरासरीचा विचार करता पाथर्डी तालुक्यातील टाकळी मंडळात ४०६ टक्के, खरवंडी मंडळात ४०१ टक्के पाऊस झाला..सप्टेंबर महिन्यातील स्थितीएकदा अतिवृष्टी झालेले मंडळे ः कापूरवाडी, सावेडी, भिंगार, चिचोंडीपाटील, नेप्ती, चास, भाळवणी, वाढेगव्हाण, निघोज, टाकळी, पळवे, श्रीगोंदा, बेलवंडी, पेढगाव, चिंभळा, देवदैठण, भानगाव, कर्जत, भांबोरा, वालवड, जामखेड, पाटोदा, नेवासा खुर्द, चांदा, घोडेगाव, वडाळा, लोणी..Crop Damage Compensation : हिंगोली जिल्ह्यासाठी २३५ कोटी मंजूर.दोन वेळा अतिवृष्टी झालेली मंडळे ः प्रवरासंगम, कोंभळी, माही जळगाव, अरणगाव, खर्डा, नान्नज, साकत, शेवगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, करंजी, मिरी, कुकाणा, केडगाव, वाळकी, पळशी, मांडवगण, कोळगाव, लोणी व्यंकटनाथ.तीन वेळा अतिवृष्टी झालेली मंडले ः रुईछत्तीशी, राशीन, मिरजगाव, चापडगाव, बोधेगाव, मुंगी, तिसगाव, अकोला, सलाबतपूर,.सप्टेंबरमध्ये तालुकानिहाय झालेला पाऊस (कंसात सरासरी. मिलीमीटर)अहिल्यानगर ः २५७ (१७८), पारनेरः २३९ (१४२), श्रीगोंदा ः २२१ (१६०), कर्जत ः २८१ (१६१), जामखेड ः २८४ (१८६), शेवगाव ः ३३२ (१४९), पाथर्डी ः ४५३ (१४६), नेवासा ः २६८ (१३२), राहुरी ः १३२ (१४९), संगमनेर ः ७१ (१२०), अकोले ः ४० (१२७), कोपरगाव ः ७८ (११९), श्रीरामपुर ः २०१ (१३५), राहाता ः १४० (१३९) .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.