Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी (ता. २७) सायंकाळी सुरू झालेला पाऊस रविवारीही (ता. २८) सुरू होता. बहुतांश भागात रात्रभर मुसळधार पावसामुळे सीना, खैरी, मुळा, प्रवरा, हंगा, कुकडी, ढोरा, नंदीनीसह जवळपास सर्वच नद्यांना पूर आल्याने पुरामुळे नदीकाठचे लोक दहशतीखाली आहेत. .शेवगाव- गेवराई, नेवासा-शेवगाव, अहिल्यानगर-पाथर्डी, नेवासा फाटा-शेवगाव, शेवगाव-पैठण, शेवगाव-तिसगाव यासह बऱ्याच मार्गांवरील वाहतूक बंद होती. चोवीस तासांत १२८ महसुल मंडलांपैकी तब्बल ८३ मंडलांत अतिवृष्टी झाली. राहाता, कोपरगाव, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, तालुक्याला मोठा फटका बसला. नेवासा तालुक्यातील सलाबतपूर मंडलात सर्वाधिक १९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. .Rain Crop Damage : अतिवृष्टी पीकनुकसानीचे ८६ टक्के पंचनामे पूर्ण.पाथर्डी तालुक्यातील घाटमाथ्यावर झालेल्या पावसाचा शेवगाव तालुक्याला मोठा फटका बसला. शेवगाव येथून गेवराईकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीला बंद होता. जामखेड तालुक्यालाही पावसाचा जोरदार तडाखा बसला. जामखेड-तुळजापूर रस्त्यावरील दरडवाडी, आनंदवाडी, राजुरी येथील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक थांबली होती..लेहनेवाडी येथील शरद प्रभाकर पवार यांच्या सात शेळ्यांचा मृत्यू झाला तर भवरवाडीच्या पोपट शिंदे यांची गाय वाहून गेली. सीना, खैरी नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या अनेक गावांत, घरात, शेतात पुन्हा दुसऱ्यांदा पाणी घुसले. पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, सातवड, घाटसिरस, तीसगाव, मढी व अन्य गावांना येथे पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा बसला. .Rain Crop Damage : मंगरुळपीर तालुक्यात पिकांचे नुकसान.अहिल्यानगर-पाथर्डी मार्गावर तसेच पाथर्डी- मोहटादेवी-शिरुर कासार मार्गावरही अनेक ठिकाणी पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक बंद होती. पारनेर, राहुरी, कोपरगाव, श्रीगोंदा, कर्जत, अहिल्यानगर तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. ३२ मंडलांत १०० मिमीपेक्षा अधिक तर चार मंडलांत दीडशे मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. आजही पिकांची प्रचंड हानी झाली..साडेबाराशे जणांचे स्थलांतरअहिल्यानगरमधील नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांचे नागरिक दहशतीखाली आहेत. राहाता तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून पाण्यामुळे धोका निर्माण झालेल्या १८ गावांतील २७७ घरांतील १२३४ लोकांचे प्रशासनाने स्थलांतर केले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.