Pune News: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात गेल्या आठवड्याभरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे भात शेती तरारली असून हा पाऊस भात पिकासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी सुखावला आहे..आठवडाभरापूर्वी पावसाने उसंत घेतली होती. परंतु सोमवार (ता. १८) पासून पावसाला पुन्हा जोरदार सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी धरण पाणलोट क्षेत्रात ९९ मिलिमीटर, आंबेगाव ७८, असाणे १६२, आहुपे २२७, राजपूर १८२ व भीमाशंकर ३४२ मिलिमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यानंतरही पाऊस कमी जास्त प्रमाणात आजअखेर सुरूच आहे..Crop Damage Survey : महापुराचे पाणी शिरलेल्या सर्व शेतीचे पंचनामे करा.या कालावधीत पडलेला पाऊस हा भात पिकाच्या वाढीसाठी आवश्यकच होता. पडत असलेला पाऊस भात पिकासाठी पोषक ठरला आहे. आंबेगाव तालुक्यात सुमारे ५९०१ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होते. यामध्ये ६२ टक्के भात लागवड रोप पद्धतीने आणि ३८ टक्के टोकण, पेरणीद्वारे होते. रोप लागवडीसाठी चारसूत्री तसेच एसआरआय पद्धतीचा अवलंब केला जातो. रोप लागवडीपूर्वी बैलाच्या साह्याने चिखलणी केली जात होती, आता पावर टिलर तसेच काही ठिकाणी मोठ्या टॅक्ट्ररचा वापर केला जात आहे..Monsoon Heavy Rain: पावसाचे देशभरात १२ बळी .यावर्षी खरीप हंगामात डिंभे मंडळ क्षेत्रात सरासरी ४७६० हेक्टर क्षेत्रापैकी ४६४६ हेक्टर क्षेत्रात भात लागवड ९७.६१ टक्के व १६२.७० हेक्टर क्षेत्रापैकी ७४.८५ हेक्टर क्षेत्रात नाचणीची लागवड ४६ टक्के झाली आहे. अशी माहिती डिंभे येथील कृषी मंडळ अधिकारी रामचंद्र बारवे व सहायक कृषी अधिकारी अरविंद मोहरे यांनी दिली..गतवर्षी तालुक्यात भात उत्पादनात वाढयांत्रिकीकरण, दर्जेदार बियाणे, योग्य लागवड पद्धतीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात उत्पादनात वाढ करत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. दिगद येथील सुरेश सखाराम विरणक यांनी चारसूत्री पद्धतीने एक गुंठ्यामध्ये ९५.६६ किलो भात उत्पादन घेत खरीप २०२४ मध्ये भात पीक स्पर्धेत राज्यात आदिवासी गटातून प्रथम क्रमांक मिळवला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.