Ahilyanagar News : बीड जिल्ह्यातील घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव मंगळवारी (ता. १९) भरला आहे. जामखेड शहराला अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. तलाव भरल्याने परिसरातील शेतकरी व शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. .भुतवडा तलावाबरोबरच खर्डा परिसरातील मोहरी तलावदेखील शंभर टक्के भरला आहे. भुतवडा तलाव हा ११९ दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. तर वरच्या बाजूला असलेल्या जोडतलावाची पाणी साठवण क्षमता ५६ दशलक्ष घनफूट आहे. .Dam Water Storage: राज्यातील एकूण पाणीसाठा ८०% च्या जवळ; उजनी, राधानगरी १००% भरले.जोडतलाव भरल्यावर ते पाणी भुतवडा तलावात येते. दोन्ही तलाव शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून बीड जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. .त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ रामेश्वर धबधब्याच्या वर असलेला भुरेवाडी तलावदेखील भरला आहे. सध्या रामेश्वर धबधबा ओसंडून वाहत आहे. भुतवडा तलावाखाली असलेल्या रत्नापूर तलावातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. .जामखेड तालुक्यातील सर्वांत मोठा खैरी माध्यम प्रकल्प ६० टक्के, रत्नापूर तलाव ८ टक्के, धोत्री तलाव ५० टक्के, धोंडपारगाव तलाव ३५ टक्के, नायगाव ३० टक्के, तेलंगशी तलाव २१ टक्के, पिंपळगाव आवळा तलाव ३३ टक्के, जवळके तलाव ४२ टक्के भरला आहे..Marathwada Water Storage : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा ९० टक्क्यांवर.भुतवडा तलावातून जामखेड शहराला पाणीपुरवठा होत आहे. विना लाइटचा संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होत असतो पण आता शहराची लोकसंख्या पाहता भुतवडा तलावातील पाणी शहराला पुरत नाही त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहराला आठ दिवसांतून एकदाच एक तास पाणी मिळत आहे. .सध्या उजनी जलशयातून जामखेड शहरासाठी पाइपलाइनचे काम सुरू आहे. यासाठी कीमान एक वर्षाचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत मात्र जामखेडकरांना भुतवडा तलाव भरला असला तरी आठ दिवसाआड पाणी मिळत असल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.