Jalgaon News : पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री वीज गेल्यास ‘झिरो’ वायरमन काम करतात. ज्या वायरमनची नेमणूक मुख्यालयात केली आहे, त्यांनी मुख्यालयी थांबणे गरजेचे आहे. मुख्यालयी न थांबणाऱ्या वायरमनविरुद्ध कारवाई करा, झिरो वायमन काम करतात अन् प्राण गमविता. मात्र नागरिकांच्या रोषाला आम्ही सामोरे जातो, वितरण कंपनीच्या कारभाराविषयी जनतेत असंतोष आहे. असा संताप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. .जिल्हाधिकारी कार्यालयातील, जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महावितरण कंपनी, कृषी विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते..आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आदी मान्यवर उपस्थित होते..Electricity Bill: ‘टीओडी’ मीटरमुळे ग्राहकांना वीजबिलात ५८ लाखांची सवलत.ते म्हणाले, की जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मंजूर असलेली महावितरणच्या विविध योजनांची प्रलंबित कामे कालबद्ध कार्यक्रम तयार करून तत्काळ पूर्ण करावीत. केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील मंजूर कामांना महावितरणकडून गती मिळणे आवश्यक असून, यासाठी संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन कामे तत्काळ पूर्ण करावीत..शेतकऱ्यांना सरसकट मदतअतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार असून, सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. आमदार सोनवणे, आमदार जावळे, आमदार पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या समस्या व अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. .जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी ‘महावितरण’ व कृषी विभागाच्या सध्या स्थितीत सुरू असलेल्या कामकाजासंदर्भात सादरीकरण केले. या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ अंतर्गत चोपडा येथील ‘पर्यावरणपूरक मानाचा गणपती’ या मंडळाने प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते चोपडा नगरपरिषदेचा सत्कार करण्यात आला..Agriculture Electricity : खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी त्रस्त.३५ हजार हेक्टरवरील पंचनामेजिल्ह्यात पावसामुळे झालेल्या ३५ हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. इतर पंचनामे सुरू आहे. सरसकट पंचनामे केले जातील. शेतकऱ्यांसह इतर आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत दिली आहे. .पंचनाम्यानंतरही लवकरच मदत मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जून महिन्यात झालेल्या केळी पीकविम्याची रक्कम चारशे कोटी लवकरच शेतकऱ्यांना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. विजेचे ट्रान्स्फॉर्मर बसविणे आदी कामांसाठी निधी आलेला आहे. त्या कामांना वेग देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.