Akola News : गेले काही दिवस झालेल्या सततच्या जोरदार पावसाने खरीप हंगामातील पिकांचे वाटोळे केले आहे. एकट्या वाशीम जिल्ह्यात १५ ते १८ ऑगस्ट या काळात तब्बल एक लाख ४८ हजार ९४५ हेक्टर, तर बुलडाण्यात एकाच दिवसात ७८,५७४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. .दोन्ही जिल्हे मिळून एकूण नुकसान दोन लाख २७ हजार हेक्टरपर्यंत आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून यंत्रणा बांधावर पोहोचू लागल्या आहेत. वाशीम जिल्ह्यात शुक्रवारपासून (ता.१५) संततधार पाऊस पडला. प्रामुख्याने वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर या तालुक्यांत धूळधाण झाली. अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंदही याच काळात झाली. .Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका.त्यामुळे शुक्रवार ते सोमवार (ता.१८) या चार दिवसांत सुमारे दीड लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाले. एक लाख ४८ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, एक लाख ३४ हजार ४७२ शेतकऱ्यांना हा फटका बसला. यात मुख्यत्वे वाशीम तालुक्यात ३९,३१० हेक्टर, रिसोड ४८,६४४, मालेगाव ५०,३११, मंगरूळपीर १०,४८९, मानोरा १८५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे..Rain Crop Damage: नुकसान आणखी वाढणार; शेतकऱ्यांची मदतीची मागणी .बुलडाणा जिल्ह्यात सोमवारी सुमारे ७९ हजार हेक्टरपर्यंत नुकसान झाले. यात सोयाबीन, तूर, केळी, कापूस, पेरू, मका, आंबा, तूर, मोसंबी, भाजीपाला अशा सर्वच पिकांचा समावेश आहे. .पावसाचा सर्वाधिक हाहाकार चिखली तालुक्यात उडाला होता. त्यामुळे नुकसानही याच तालुक्यात सर्वाधिक ६३,२१४ हेक्टरवर आहे. मेहकरमध्ये १,२८२०, संग्रामपूर तालुक्यात २४७२ हेक्टरला फटका बसला. ३३९ गावांत हे नुकसान झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.