Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने पिकांच्या नुकसानीचा इतिहासच घडवला आहे. दोन दिवसाच्या पावसाने जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून पावसाचा भूम, परंडा, धाराशिव व उमरगा तालुक्यातील २७० गावांना फटका बसला आहे. एकाच मंडलात पुन्हा पुन्हा अतिवृष्टी झाल्यामुळे पिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे. .हजारो घरांचे नुकसान झाले असून प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदी व नाल्यांना पूर येऊन नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसले आहे. मांजरा धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच ५५ हजार ११३ क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात अनेक गावांना पुराने वेढा दिल्यामुळे अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात येत आहे. .Crop Damage: मंत्र्यांनी नौटंकी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी; किसान सभेची मागणी.जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने सोमवारी (ता. २२) रात्रीही हजेरी कायम ठेवली. रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. नदीनाल्यांचे पाणी घर व शिवारात घुसले. पिके पाण्याखाली गेली. काही भागात नदी व नाल्यांचा प्रवाह बदलल्याने जमीन खरडून मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५१.७ मिलिमीटर पाऊस झाला असून २२ मंडळात अतिवृष्टीची झाली आहे. यात सोमवारीही बावीस मंडळातच अतिवृष्टी झाली होती..४० पैकी ३८ मंडळात अतिवृष्टी झाली असून आठ दिवसात यातील तीस मंडळात दुसऱ्यांदा, बारा मंडळात तिसऱ्यांदा तर दोन मंडलांत चौथ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी काढलेल्या प्राथमिक अंदाजानुसार एक लाख ७० हजार १३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वावाधिक नुकसान परंडा तालुक्यातील ६० हजार ८० हेक्टवरील पिकांचे झाले आहे. त्यानंतर भूम तालुक्यातील ४७ हजार ५०९ हेक्टर, धाराशिव तालुक्यातील ४३ हजार ६९० हेक्टर तर उमरगा तालुक्यातील १८ हजार ८६३ हेक्टवरील पिकांना फटका बसला आहे..Soybean Crop Damage: सोयाबीन शेतातच अंकुरले! .परंडा व भूम तालुक्यात लहानमोठे मिळून १८६ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. याच दोन्ही तालुक्यात ७४६ घरांची पडझड झाली आहे. एक लाख ७० हजार १७ हेक्टरवरील जिरायती, ४० हेक्टरवरील बागायती तर ७५ हेक्टवरील फळपिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे हाती घेतले आहेत. दोन दिवसात ३३ हजार १९ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झाले असून उरलेल्या क्षेत्राचे पंचनामे वेगाने सुरु आहेत. सोमवारी रात्रीच्या पावसाने भूम, परंडा व वाशी तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे..कुऱ्हाळी व कदमापूर (ता. उमरगा) पाझर तलाव फुटून शेतीचे नुकसान झाले आहे. कोंड (ता. धाराशिव) येथील तांडगी पाझर तलावाचा भराव खचल्याने सांडवा फोडून पाणी सोडून देण्यात आले आहे. भूम तालुक्यातील पाझर तलाव फुटल्याने पिकांसह जमीन खरडून वाहून गेली आहे. जमिनीचे खरडून नुकसान मोठे झाले असून यासाठी वाढीव भरपाई मंजूर करावी, अशी मागणी परंडाचे आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. .Soybean Crop Damage: ऑगस्टमधील पावसाने ५५ टक्के सोयाबीन उद्ध्वस्त.पंचनामे होताच हाती मदतमंगळवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भूम तालुक्यातील ढगे चिंचपूर येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. पूरग्रस्त तसेच शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसानीचे पंचनामे दाखल होताच शेतकरी व पूरग्रस्तांना मदत देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही पूरग्रस्तांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. .चार वर्षांनंतर ‘रायगव्हाण’ तुडुंबलातूर व धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश लहानमोठे प्रकल्प महिन्यापूर्वीच भरून वहात आहे. रायगव्हाण (ता. कळंब) मध्यम प्रकल्प मात्र, याला अपवाद होता. १२.७० दलघमी साठवण क्षमता असलेल्या प्रकल्पात नऊ सप्टेंबर रोजी १८ टक्के पाणीसाठा होता. बारा दिवसात प्रकल्प तुडुंब भरला असून दोन दिवसाच्या पावसाने प्रकल्पात मोठे पाणी आले. मंगळवारी सकाळी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले..Crop Damage Compensation : अतिवृष्टीग्रस्तांना जुन्या मापदंडानुसार ५५३ कोटी मंजूर.१९८७ मध्ये बांधलेले हे धरण ३७ वर्षात सात वेळा भरले आहे. २०२१ नंतर मंगळवारी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. दरम्यान मांजरा धरणातून ऐतिहासिक विसर्ग सुरु असल्याने मांजरा नदीला पूर आला असून नदीने पात्र ओलांडल्याने लातूर जिल्ह्यात नदीकाठच्या नागरिकांना व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिली..लातूर जिल्ह्यातही मोठे नुकसानतीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने लातूर जिल्ह्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी आठपर्यंत मागील चोवीस तासात जिल्ह्यात साठपैकी दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. तेरणा नदीला पूर आल्याने औसा तालुक्यातील उजनी व काही गावांत पाणी शिरले. या भागात पुरात अडकलेल्यांसाठी शोध व बचाव कार्य सुरु होते. अनेक भागात रस्त्यावरील वाहतूक पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद आहे..Crop Damage Compensation : अतिवृष्टीच्या संकटात शासन बळीराजाच्या पाठीशी ः भरणे.वीज पडून एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला असून एक पुरात वाहून गेला आहे. शेळ्या व जनावरेही मृत्यू पावले आहेत. दरम्यान जिल्ह्यात सरासरी ३५.३ मिलिमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक ६१.५ मिमी पाऊस लातूर तालुक्यात तर सर्वात कमी ११.१ मिमी पाऊस देवणी तालुक्यात झाला आहे. औसा तालुक्यात - ३९.१, अहमदपूर- ३२.२, निलंगा- ३४.८, उदगीर- ३३.१, चाकूर- ३३.२, रेणापूर- १५.२, शिरूर अनंतपाळ- २५.९ तर जळकोट तालुक्यात ३२.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे..खासदार निंबाळकरांचा बचाव कार्यात सहभागजिल्ह्यात अतिवृष्टीने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असताना सर्वच लोकप्रतिनिधींनी पुरात अडकलेल्यांचा मदतीसाठी धाव घेतली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सोमवारी वडनेर (ता. परंडा) येथे पुरात उतरून एकाच कुटुंबांतील दोन वर्षाचा मुलगा व तिघांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी योगदान दिले. त्यांच्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नवरात्रमहोत्सवात तुळजाभवानी देवीची पहिल्या माळेची पूजा होताच आमदार राणा जगजितसिंह पाटील व जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी धाव घेतली..बचाव कार्यात रात्री उशिरापर्यंत सहभाग दिला. आमदार सावंत यांनीही दिवसभर मतदारसंघात हजेरी लावली. आमदार कैलास पाटील हेही रात्रभर आपदग्रस्तांसोबत मतदारसंघात फिरत होते. आमदार प्रवीण स्वामी यांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटून दिलासा दिला. संकटाच्या वेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दिलेल्या प्रतिसादामुळे नागरिक व शेतकऱ्यांना मोठा धीर आला. लष्कर, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व एनडीआरएफच्या पथकांनीही झोकून देऊन शोध व बचाव कार्य करून शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहच केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.