Latur / Dharashiv News : अतिवृष्टीमुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये तब्ब्ल पावणेतीन लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राधमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान लातूर जिल्ह्यात झाले असून दीड लाख हेक्टरला फटका बसला आहे. तर धाराशिव जिल्ह्यात सव्वालाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. लातूर जिल्ह्यातील ५५० तर धाराशिव जिल्ह्यातील ३१५ गावांना अतिवृष्टीने फटका बसला असून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने वेग दिला आहे..लातूरमधील दोन लाख ३२ हजार २४४ शेतकऱ्यांच्या सुमारे एक लाख ४७ हजार ५९३ हेक्टर तर धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ५६ हजार ४९० शेतकऱ्यांच्या एक लाख २१ हजार १११ हेक्टरवर पिकांना अतिवृष्टीची बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लवकरच नुकसानीचे वास्तव समोर येऊन भरपाईसाठी निधी मागण्याचे प्रस्ताव राज्य सरकारकडे केली जाणार आहे..दोन्ही जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यात लातूर जिल्ह्यात १७ ऑगस्ट रोजी काही भागात अतिवृष्टी झाली. उदगीर तालुक्यातील धडकनाळ व बोरगाव ही गावे पुरामुळे उद्ध्वस्त झाली. पुरामुळे जमिनी खरडून गेल्या. त्यानंतर २७ व २८ ऑगस्ट रोजीही अतिवृष्टी झाली. काही मंडलांत दोनशे मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला. यामुळे पिकांचे व जमिनीचे मोठे नुकसान झाले. घरांची पडझड झाली. वीज पडून व पुरात वाहून जाऊन जनावरे मृत्यूमुखी पडली. सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. .बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्याची वेळ प्रशासनावर आली. यापूर्वी १७ ऑगस्ट रोजीच्या पावसाने दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन दोनशे हेक्टरवरील जमीन खरडून गेली होती. २७ व २८ ऑगस्टच्या पावसामुळे किती तरी पटीने अधिक नुकसान झाले आहे. ५५० गावांतील एक लाख ४७ हजार हेक्टरवरील पिके अतिवृष्टीने वाया गेल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. .नुकसानीची अजून मोजदाद सुरू असून हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली तरी जमिनीतून पाणी बाहेर पडण्याचे प्रमाण कायम असल्याने नदी व नाले वाहत आहे. यामुळे भरलेल्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी सातत्याने दरवाजे उघडून बंद करण्यात येत आहेत..Crop Damage Survey : सोलापूर जिल्ह्यात ६० टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण.धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात सर्वाधिक ५९ हजार ८२८ हेक्टर पिके मातीमोल झाली. खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसह उडीद, मुगाच्या उत्पादनात लक्षणीय घट येण्याची चिन्हे आहेत. नुकसानग्रस्त पिकांपैकी आतापर्यंत पन्नास टक्के म्हणजे ५७ हजार २०६ हेक्टर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले. .Crop Damage : विदर्भात पावसामुळे शेतशिवार खरडले.पीक नुकसानीमध्ये जिरायती पिकांना सर्वाधिक फटका बसला. तब्बल १ लाख २० हजार ७९० हेक्टर जिरायती पिकांचे नुकसान झाले, तर तीनशे हेक्टरवरील बागायती पिकांना व ४१.६० हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. १३ ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे पंधरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर सातत्याने पाऊस होऊन नुकसानीचे प्रमाण वाढतच गेले..नुकसानीची आकडेवारीनुकसान - लातूर जिल्हा - धाराशिव जिल्हाबाधित गावांची संख्या - ५५० - ३१५बाधित शेतकरी - दोन लाख ३२ हजार २४४ - १ लाख ५६ हजार ४९०शेतीचे नुकसान हेक्टरमध्ये - एक लाख ४७ हजार ५९३ - एक लाख २१ हजार १११पशुहानी - २७ - ९९घरांची पडझड - ४०६ - १८९.लातूर जिल्ह्यात आठवड्यात सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे बचाव कार्याला प्राधान्य देण्यात आले. यामुळे बहुतांश यंत्रणा बचाव कार्यात व्यस्त होती. आता सखल भागातील जमिनीतील पाण्याचा निचरा होताच पंचनाम्यांना वेग येईल. बचाव कार्य संपल्याने यंत्रणांकडून पंचनामे करण्याचे काम हाती घेण्यात येईल.- केशव नेटके, निवासी उपजिल्हाधिकारी, लातूर.सातत्याने पाऊस होत असल्याने पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. अजूनही पिके पाण्याखाली आहेत. तरीही यंत्रणांकडून पंचनामे वेगाने सुरू असून पन्नास टक्के काम तडीस नेण्यात आले आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतर भरपाईसाठी सरकारकडे निधीची मागणी करण्यात येईल.- शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.