Buldana News : जिल्ह्यात चिखली, मलकापूर, सिंदखेड राजा, खामगाव यांसह इतर भागांमध्ये अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या. तसेच सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मक्यासह फळबागा आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे जगाचा पोशिंदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. .शेतकऱ्यांना सावरण्यासाठी महायुती सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे केली आहे..निवेदनामध्ये म्हटले, की पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांवर यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे संकट ओढवले आहे. महसूल विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार सुमारे आठ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांना बसला आहे..Ola Dushkal : ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र करणार .बुलडाणा जिल्ह्यात तब्बल तीन लाख तीन हजार ७६८ हेक्टर, तर यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख ६५३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या आपत्तीमध्ये ५४ नागरिकांचा मृत्यू, तर शेकडो जनावरे दगावली असून ११ हजारांहून अधिक घरे व गोठ्यांची पडझड झाली आहे. एकूण तीन लाख ४६ हजार ३९७ नागरिक प्रभावित झाले असून, हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सोबतच हुमणी अळी आणि येलो मोझॅक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे तसेच अतिवृष्टीमुळे ७० ते ८० टक्के सोयाबीनचे पिकांचे नुकसान झाले आहे. .सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. परंतु, शासनाचे खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने आपला सोयाबीन विक्री करावी लागत आहे. म्हणून शासनाने लवकरात-लवकर शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करावी, अशी मागणीही सानंदा यांनी केली आहे. नुकसान झालेल्या कुटुंबांना विशेष मदतीचे पॅकेज देण्यात यावे. दसरा किंवा दिवाळीपूर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तातडीने मदतीची रक्कम जमा करावी अशी मागणी केली आहे..Ola Dushkal : अहिल्यानगर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा.नुकसान भरपाईची मदतीची मागणीअकोला : जिल्ह्यात २६ आणि २७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पाण्याच्या ओघामुळे जमिनीची धूप होऊन शेतीचे अतिरिक्त नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे. तातडीने मदत दिली जावे अशी मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे..याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात खासदार धोत्रे यांनी म्हटले की, महापुरामुळे नदी-नाल्यांतील पाणी नागरी वस्तीत शिरल्याने काही घरांचे नुकसान झाले असून रस्ते व पूल देखील हानीग्रस्त झाले आहेत. .या सुविधांच्या त्वरित दुरुस्तीची गरज असल्याचे स्थानिक प्रशासनाने नमूद केले आहे. आपत्तीग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्याची आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, पूरग्रस्त रस्ते व पूल दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचेही म्हटले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.