Nashik News: नाशिक जिल्हा रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा उत्पादनासाठी आघाडीवर असतो. त्यासाठी काही शेतकरी आगाप कांदा लागवडीच्या अनुषंगाने येवला, चांदवड, दिंडोरी, नांदगाव, देवळा, निफाड, कळवण या प्रमुख कांदा उत्पादक तालुक्यांमध्ये शेतकरी नियोजन करतात. त्या अनुषंगाने जवळपास २००० हजार एकरांवर रब्बी उन्हाळ कांदा रोपवाटिका तयार करण्यात आल्या होत्या. मात्र अतिवृष्टीच्या तडाख्यात नुकसान झाल्याने जवळपास १५ कोटी रुपयांहून अधिकचे बियाणे मातीमोल झाले. तर शेतकऱ्यांच्या आगामी कांदा लागवडीचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे..जिल्ह्यात २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीने तडाखा दिला. त्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला तयार केलेल्या उन्हाळ कांदा रोपवाटिकांचे मोठे नुकसान आहे. ज्यामध्ये टाकलेले महागडे कांदा बियाणे पूर्णतः खराब झाले आहे. काही ठिकाणी रोपे लागवडी करून एक ते दोन आठवडे झाले होते. कोवळ्या रोपांनी डोके वर काढले असतानाच अतिवृष्टीच्या तडाख्यात रोपे वाहून गेली तर पाणी साचून सडलेली आहेत. कृषी विभागाने जाहीर केलेल्या प्राथमिक नुकसान अहवालात कळवण, देवळा व निफाड या तीनच तालुक्यांत ३४७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची माहिती आहे..Onion Crop Damage : लाखमोलाचा कांदा पावसामुळे मातीमोल.संभाव्य पाण्याची उपलब्धता व मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर आगाप लागवड तसेच कांदा लागवडी व काढणीसाठी मजूरटंचाई होत असल्याने शेतकरी पूर्वतयारी करून रोपवाटिकांची नियोजन करतात. त्यानुसार शेतकऱ्यांनी बियाणे पेरणी केली होती. मात्र अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या संकटांवर पाणी फिरवले आहे. आता दुबार रोपवाटिका तयार करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी अद्याप वापसा अवस्था नसल्याने कामकाज रखडले आहे..अगोदरच उन्हाळ कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. असे असताना शेतकऱ्यांनी पुन्हा पदरमोड करून कांदा लागवडीचे नियोजन केले. त्यात अगोदर शासनाच्या अस्थिर धोरणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अस्मानी संकटाने घेरले आहे. रोपवाटिकांची मोठी हानी झाल्याने उत्पादन खर्चात वाढ होण्यासह संभाव्य कांदा लागवडीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्यातच सरकार या परिस्थितीत शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार हे पाहणे अपेक्षित आहे..Kharif Onion Crops Damage : अतिवृष्टीचा खरीप, लेट खरीप कांद्याला फटका, ८० टक्के पिकाचे नुकसान.रोपवाटिकांमध्ये नुकसानीची स्थितीअतिवृष्टीने कोवळे रोप झोडपल्याने रोपांची मोठी हानीशिवारातून पाणी वाहिल्याने रोपे वाहून गेलीजमिनीत अद्याप पाणी साचून असल्याने बुरशीच्या प्रमाणात वाढसपाट वाफ्यावरच कांद्याची रोपनिर्मिती असल्याने पाणी साचून रोपांची मरअद्याप वापसा अवस्था नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणीथोडीफार रोपे जगली पण धुक्यामुळे नुकसानीत वाढ.२५ किलो बियाणे एक एकर क्षेत्रावर टाकले होते. उगवण होऊन १५ दिवस झाले असताना २२ तास सलग पाऊस झाला. त्यात रोपे सडून गेल्याने रोपवाटिकांची दयनीय अस्थस्था आहे. पाऊण लाख रुपयांचे बियाणे मातीआड केले आणि ते वाया गेले.तुळशीराम कोकाटे, नुकसानग्रस्त शेतकरी, साताळी, ता. येवला.लेट खरीप व उन्हाळ कांदा रोपवाटिका पूर्ण खराब झाल्या. अतिधुके असल्याने रोप वाचणे कठीण असून पुन्हा नवीन कांदा बियाणे टाकण्यास सुरुवात केली आहे. ज्ञानेश्वर कांगुणे, नुकसानग्रस्त शेतकरी, हिरापूर, ता. चांदवड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.