Dharashiv News : अतिवृष्टीमुळे पिकांत पाणी साचल्याने प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान झालेले. पाच दिवस संततधार राहिल्याने जमिनी चिभडल्या आहेत. त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली आहे. शेंगांमधील दाण्यांच्या फुगवणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. .सध्या मूग, उडीद पिके काढणीच्या स्थितीत आहेत. तर, लवकर पेरलेले सोयाबीन पीक शेंगा परिपक्वतेच्या स्थितीत, तर मागून पेरलेले फुलोऱ्यात आहे. त्यामुळे यंदा पिकांची काढणी देखील मागे-पुढे होणार आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे व पाच दिवस कायम राहिलेल्या संततधारेमुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. .Crop Damage Survey : अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू.त्यामुळे सोयाबीनची पिके पिवळी पडली आहेत. अजूनही पिकांत पाणी कायम असल्याने ही पिके वाया गेल्यात जमा आहेत. विशेषतः कळंब, धाराशिव, भूम, वाशी, परंडा तालुक्यांत पिके पिवळी पडली आहेत. तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यांतही कमी-अधिक प्रमाणात ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही हातात येणार नाही, अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत..Rain Crop Damage : साहेब, आता सगळं संपलं; शेतात फक्त पाणीच पाणी.जिल्ह्यात सव्वापाच लाख हेक्टरवर खरीप पेरणीजिल्ह्यात यंदा सोयाबीनसह उडीद, मुगाचेही क्षेत्र वाढलेले आहे. सोयाबीन आणि उडदाची सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जादा पेरणी झालेली आहे. ४ लाख १९ हजार ४८१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असलेले सोयाबीन ४ लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक, तर ४० हजार ३६५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असलेला उडीद ४२ हजार हेक्टरच्या घरात गेलेला आहे. जिल्ह्यात एकूण सव्वापाच लाख हेक्टरच्या पुढे खरीप पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे..पाच एकर क्षेत्रावर सोयाबीन आहे. त्यातील निम्मे पीक पाण्यात आहे, तर निम्मे बरे आहे. पीक पिवळे पडले आहे. उत्पादनाला ३० ते ४० टक्के फटका बसणार आहे. त्यात भाव चांगला नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही निघतो की नाही याची चिंता आहे. पिकावरच सणसूद, लेकरांच्या शिक्षणाच्या खर्चासह घरप्रपंच अवलंबून आहे.- अमोल माळी, शेतकरी, भूम.दहा एकरांवर सोयाबीन आहे. प्रत्येक तुकडा अर्धा पाण्यात आहे. पाच एकरांचे जादा नुकसान आहे. उत्पादनाला ५० टक्के फटका बसेल. शेंगा भरायच्या टायमाला अतिपावसाने कहर केला. पाण्यामुळे सोयाबीन पिकाची मुळीचं काम करायची थांबली. त्यामुळे पिके पिवळी पडून फटका बसला आहे. - लक्ष्मण हाजगुडे, शेतकरी, आंबेजवळगे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.