Pune News: आधीच दर आणि उत्पादकतेने त्रासलेल्या राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याना यंदा अस्मानी संकटाने चांगलेच छळले आहे. सोलापूरसह मराठवाडा, नाशिक, अहिल्यानगरच्या ऊस पट्ट्यातील काही भागांत अतिवृष्टीमुळे पीक अद्यापही पाण्यात आहे. राज्यातील विविध नदीकाठांवरील क्षेत्रात पुरामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे चालू हंगामातही १०० लाख टन ऊस कमी मिळण्याची शक्यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. .गारपीट वगळता मोठ्या पावसातही किमान नुकसान होणारे पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. मात्र यंदा बहुतांश मराठवाडा आणि काही प्रमाणात पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात यंदाच्या अतिवृष्टीने ऊस पीक चांगले प्रभावित झाले आहे. राज्यात सीना, भीमा, शिवनी, सिंदफणा, बिंदुसारा, लेंडी, आसना, प्रवरा, गोदावरी, तेरणा, मांजरा, मन्याड, पूर्णा, दुधना तसेच गिरणा आदी नद्यांच्या काठची ऊसशेती अंशतः ते पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे..Sugarcane Farming: ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी .पावसाचे दिवस वाढल्यामुळे ऊस पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. परिणामी अनेक भागांत उसाची वाढ खुंटली असून रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातून उत्पादकतेत प्रति हेक्टरी आठ टनाने घट येऊ शकेल, अशी साखर उद्योगाची माहिती आहे..‘‘उत्पादकतेचा आधीचा अंदाज प्रति हेक्टरी ८२ टनांचा होता. परंतु आता ती ७४ टनांच्या आसपास राहील, असे वाटते. राज्यात एकूण ऊस उत्पादन १२०० लाख टनांच्या आसपास राहण्याचा आधीचा अंदाज होता. परंतु आताचे चित्र बघता गाळपाला १०९० ते ११०० लाख टन ऊस मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, गेल्या हंगामात एकूण ऊस उपलब्धता केवळ ८५० लाख टन होती. यंदा अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही उपलब्धता मात्र गेल्या हंगामापेक्षा २०० ते ३०० लाख टनाने जास्त असेल,’’ असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे म्हणणे आहे..Sugarcane Price Cut: प्रतिटनामागे १५ रुपयांची कपात...! 'हा तर शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशावर दरोडा', राजू शेट्टींचा आरोप, रोहित पवारांचाही सरकारवर हल्लाबोल .वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) मात्र उसाचे नुकसान मर्यादित असल्याचे म्हटले आहे. ‘‘नदीकाठच्या उसाची काही जिल्ह्यात हानी झाली आहे. परंतु नुकसानीची तीव्रता कापूस किंवा सोयाबीनप्रमाणे व्यापक नाही. त्यामुळे एकूण ऊस पुरवठ्यात फार तर २ ते ३ टक्के घट येईल,’’ असे ‘विस्मा’च्या सूत्रांनी सांगितले..राज्यात यंदाच्या गळितासाठी उपलब्ध ऊस...अपेक्षित ऊस उत्पादन : १२०० लाख टनअतिवृष्टीने अपेक्षित नुकसान : १०० लाख टनउपलब्ध होणारा ऊस : ११०० लाख टन.यंदा गेल्या हंगामापेक्षा जास्त ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे साखर उत्पादन वाढून १३० लाख टनांच्या आसपास राहील. साखरेचे अतिरिक्त उत्पादन टाळायचे असल्यास शासनाने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन द्यायला हवे.बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, ‘विस्मा’.ऊस शेतीला पुराचा फटका बसूनदेखील राज्यात ऊस जास्त आहे. त्यामुळे इथेनॉलची दरवाढ तसेच साखरेच्या किमान विक्री दरात वाढ (एमएसपी) करण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे अपेक्षित आहे.संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.