Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, हिंगोली, धाराशीव या जिल्ह्यांतील ३३ मंडलांत रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. .इतरही जिल्ह्यांत अनेक भागात पावसाने हलकी, मध्यम, दमदार ते जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जोरदार पाऊस झालेल्या भागातील नदी नाले ओसंडून वाहू लागले. शिवाय शेत शिवारात पाणी शिरल्याने पिकांची मोठी हानी झाली..पावसाळ्याच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याची स्थिती आहे. सक्रिय होत असलेल्या या पावसाने आधी मोठ्या प्रमाणात केलेल्या नुकसानीत पुन्हा एकदा भर घालण्याचे काम सुरू केले आहे. .Crop Damage Compensation : एक महिना होऊनही मिळेना मदत.अनेक शेतीमध्ये पाणी शिरून कपाशी, सोयाबीन, कांदा यासह इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान आता झालेल्या पावसाने केले आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील दहा, जालन्यातील पाच, बीडमधील सात, लातूरमधील सात, धाराशिवमधील एक, नांदेडमधील दोन व हिंगोलीतील एका मंडलाचा समावेश आहे..नांदेडमध्ये दोन मंडलांत अतिवृष्टीनांदेड : नांदेड जिल्ह्यातील दोन महसूल मंडलांमध्ये रविवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी मंडलात तब्बल १२०.२५ मिलिमिटर पाऊस नोंदवला गेला आहे. तर बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी मंडलात ८० मिलमीटर पावसाची नोंद झाली आहे..जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली असून खरीप पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात रविवारी सरासरी १३.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या १६ तालुक्यांपैकी सर्वाधिक पाऊस नायगाव तालुक्यात ३७.८० मिलिमीटर नोंदविला गेला. .Crop Damage Compensation : सरकारने पुसली अतिवृष्टिग्रस्तांच्या तोंडाला पाने.त्यानंतर बिलोलीत ३५.७० मिलिमीटर तर नांदेड तालुक्यात २५.२० मिलिमीटर पाऊस पडला. किनवट येथे १४.९० मिलिमीटर, हदगाव ११.५० मिलिमीटर, कंधार १२.४० मिलिमीटर पाऊस झाला. तर तालुक्यांमध्ये अल्प प्रमाणात पाऊस झाला. दरम्यान एक जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. आगामी दिवसांत अजूनही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर) :नांदेड २५.२०, बिलोली ३५.७०, मुखेड २.२०, कंधार १२.४०, लोहा १९.१०, हदगाव १.१०, भोकर ३.८०, देगलूर ०.५०, किनवट १४.९०, मुदखेड ०.३०, हिमायतनगर २.३०, माहूर २०.८०, धर्माबाद १.७०, उमरी १७.२०, अर्धापूर ४.००, नायगाव ३७.८०. जिल्ह्यात सरासरी १३.६० मिलिमीटर पाऊस झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.