Nanded News : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी किनवट व माहूर या तालुक्यातील पाच मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १२.६० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ८०० मिलिमीटरनुसार वार्षिक सरासरीच्या ८९.७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे..नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. पहिल्या दिवशी १७, तर दुसऱ्या दिवशी ६९ मंडळांत अतिवृष्टी झाली. यानंतर तिसऱ्या दिवशी किनवट, माहूर तालुक्यांत पाऊस झाला. तालुका किनवट आणि माहूर परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली. .Rain Crop Damage : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान.सर्वाधिक पाऊस माहूर तालुक्यातील सिंदखेड मंडळात १२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर किनवट तालुक्यातील उमरी बाजार मंडळात १२७.२५ मिलिमीटर झाला. यासोबतच जलधारा ७७, सिंदगी ८२.७५, वानोला ८२.७५ मिलिमीटर पाऊस झाला. .अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे नद्यांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतातील उभ्या पिकांवर तसेच जनजीवनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..Crop Damage Survey : बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करा.नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात आजपर्यंत एकूण ८०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस आजपर्यंत पडणाऱ्या सरासरीच्या तुलनेत १२५.२० टक्के इतका आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १२.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाहता सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात ९५५.७० मिलिमीटर नोंदला गेला..त्याचप्रमाणे हदगाव ८२८, उमरी ७९३.२०, भोकर व नायगाव ६७६.१० मिलिमीटर या तालुक्यांत लक्षणीय पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सर्वांत कमी पाऊस नायगाव तालुक्यात ६७६.१० मिलिमीटर झाला आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत किनवट ४८.५०, माहूर ६१.३०, हदगाव १३.९०, देगलूर ११.९० मिलिमीटर झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.