Heavy Rainfall : नांदेड जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून, शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पाच महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी १९.५० मिलिमीटर पाऊस झाला. बिलोली तालुक्यातील लोहगाव मंडलात सर्वाधिक ९१.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यासोबतच तळणी, निवघा, जवळगाव आणि मालेगाव या मंडलांतही ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला..हदगाव तालुक्यातील तळणी मंडलात ७०.५० मिलिमीटर, निवघा मंडलात ७१.७५ मिलिमीटर, हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव मंडलात ६८.२५ मिलिमीटर, तर अर्धापूर तालुक्यातील मालेगाव मंडलात ६६.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Marathwada Heavy Rain: पावसाने मराठवाडा ‘चिंब’.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके पावसाच्या प्रतीक्षेत होती. त्यानंतर झालेल्या पावसामुळे काही भागांतील पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पावसाचे वितरण अद्याप असमान असून, अनेक भागांत अपेक्षित जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे..Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची अद्याप प्रतीक्षा.हंगामातील तूट कायमजिल्ह्यात १ जूनपासून १८ सप्टेंबरपर्यंत अपेक्षित सरासरी ७४७.४० मिलिमीटर पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष ५६१.३० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यात शुक्रवारी झालेल्या १९.५० मिलिमीटर पावसाची भर पडल्याने हंगामातील एकूण पाऊस ५८०.८० मिलिमीटर झाला आहे. जिल्ह्याची १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील वार्षिक सरासरी पर्जन्यमानाची अपेक्षा ८९१.३० मिलिमीटर आहे. .आतापर्यंत झालेला पाऊस त्याच्या ६५.१६ टक्के आहे. त्यामुळे अद्याप ३१०.५० मिलिमीटर पावसाची तूट आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर यांसह खरीप पिकांवर परिणाम होत असताना, काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतील पावसाचे प्रमाण आणि वितरण खरीप पिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.