Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात पेरणी झालेल्या कपाशी व सोयाबीनच्या पिकावर काही ठिकाणी " आकस्मिक मरचा प्रादुर्भाव झाला आहे. .अति पावसाचे प्रमाण यातील प्रमुख कारण असून कपाशीची पाते व फुलगळ ही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. इतरही पिकाला नैसर्गिक आपत्ती व सततच्या पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळे सर्वच पिकाच्या उत्पादनात घटीचा अंदाज असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली..छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत खरिपाच्या सर्वसाधारण २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर क्षेत्रापैकी २० लाख ४९ हजार ४१७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये सर्वाधिक कपाशीची लागवड झाली असून त्या पाठोपाठ सोयाबीनचे क्षेत्र आहे. निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र या दोनच पिकांनी व्यापले आहे..कपाशीची स्थिती बिकटतीन जिल्ह्यातील कपाशीच्या सर्वसाधारण १० लाख ३४ हजार ७४८ हेक्टर क्षेत्रापैकी ७८.१५ टक्के म्हणजे सुमारे ८ लाख ८ हजार ६१८ हेक्टरवरच कपाशीची लागवड झाली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कपाशीचे पीक काही ठिकाणी बोंडे पक्व पुण्याच्या अवस्थेत आहे. परंतु सततच्या पावसामुळे पाते व फुलांची गळ मोठी होते आहे. .जालना जिल्ह्यातील कपाशीचे पीक बोंडे भरण्याच्या अवस्थेत असून सततच्या पावसामुळे काही ठिकाणी आकस्मिक मर चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. बीड जिल्ह्यातील कपाशीचे पीक काही ठिकाणी बोंडे लागण्याच्या तर काही ठिकाणी धोंडे पक्वतेच्या अवस्थेत आहे गतकाही दिवसात झालेल्या सततच्या अति पावसामुळे काही ठिकाणी आकस्मिक मर चा प्रादुर्भाव झाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली..Soybean Crop Disease: सोयाबीनवरील तांबेरा, करपा, मोझॅकची लक्षणे.सोयाबीनलाही मोठा फटकाछत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख १२ हजार २८ हेक्टर असून प्रत्यक्षात ६ लाख ५ हजार ९५५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११८.३४ टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयाबीनवर काही ठिकाणी पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे..जालना जिल्ह्यातील सोयाबीन काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत असून परिपक्व झालेल्या सोयाबीनची काही ठिकाणी काढणी सुरू आहे. काही ठिकाणी आकस्मिक मर चा प्रादुर्भाव झाला असून सततच्या पावसाने उत्पादनात घट येणार हे जवळपास स्पष्ट आहे. बीड जिल्ह्यात सोयाबीन चे पिक शेंगा पक्वतेच्या तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे..Soybean Crop Damage: तीस टक्के सोयाबीनला पावसाचा जबर फटका.वडवणी तालुक्यात सोयाबीन वर शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भावआढळून आला आहे. गेवराईतालुक्यात काही प्रमाणात पाने खाणारी तर काही प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव सोयाबीनवर आढळून आला, असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली..इतर पिकांची स्थितीमका : जालना व छत्रपती संभाजीनगरमधील मकाचे पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे.बाजरी : पीक पक्वतेच्या ते काढणीच्या अवस्थेत आहे.मूग : मुगाचे पीक काढणीच्या अवस्थेत तर काही ठिकाणी काढणीच्या अंतिम टप्प्यात आहे.उडीद : उडीदाचे पीक काढणीच्या अवस्थेत असून सततच्या पावसामुळे काढणीत विलंब होतो आहे.खरिप ज्वारी : खरीप ज्वारीचे पीक तीनही जिल्ह्यात वाढीच्या अवस्थेत आहे.भुईमूग : कुठे वाढीच्या कुठे पक्वतेच्या तर कुठे काढणीच्या अवस्थेत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.