Beed News: सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात बीड जिल्ह्यातील सर्वाधिक १५ मंडलांत अतिवृष्टी झाली. आष्टी तालुक्यात या पावसाचा जोर सर्वाधिक होता. तालुक्यात रविवारी (ता. १४) झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर येऊन तालुक्यातील कडा, सुलेमान देवळा, पिंपरखेड, धानोरा, शिरापूर, टाकळी अमिया आणि डोंगरगण या गावांचा संपर्क तुटला. .कडा गावातील ११ नागरिक तर सुलेमान देवळा ६, पिंपरखेड ३, धानोरा ३, डोंगरगण ३, शिरापूर १० व टाकळी अमिया १५ असे एकूण सात गावांतील ५१ लोक पुरात अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नांनी एअरलिफ्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे..Beed Flood : पुरात वाहून गेलेल्या तीघांना वाचवण्यात यश; एकाचा मृत्यू.सायंकाळी ५ पर्यंत २१ जणांना सुखरूप बाहेर काढणयात यश आले आहे. एअर फोर्सच्या माध्यमातून पूरबाधित गावांतील नागरिकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी सैन्यदल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू केले आहे..उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी, पूरबाधित गावांतील नागरिकांना आवश्यक ते मदतकार्य तत्काळ करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. त्यानुसार तत्काळ कार्यवाही स्थानिक पथक व शोध व बचाव पथकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे..Beed Flood Accident: पुरात वाहून गेलेले तिघे बचावले, एकाचा मृत्यू .जिल्हा नियंत्रण कक्ष, मंत्रालय नियंत्रण कक्ष, एनडीआरएफ, लष्कर, विभागीय नियंत्रण कक्ष यांच्यासमवेत समन्वय साधण्यात येत असून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी स्वतः संपर्क ठेवून आहेत व पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. पूरग्रस्त गावांतील नागरिकांनी घाबरू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे..जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सर्वांशी समन्वय साधून आवश्यक ठिकाणी मदत पाठवण्यासंदर्भात व बचाव कार्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. आमदार सुरेश धस हे प्रत्यक्ष घटनास्थळावर असून संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या मदतीत पूरबाधित क्षेत्रात मदत कार्य सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.