Uttarakhand News: उत्तराखंडमधील चामौली जिल्ह्यावर आभाळ फाटले असून थराली गावात रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरी वस्त्यांप्रमाणेच व्यापारपेठांमध्येही पुराचे पाणी घुसले आणि राडारोडा वाहून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. येथील सरकारी कार्यालयांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. .अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात दोघेजण बुडाल्याचा संशय असून शेकडोजण ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याची भीती स्थानिक यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या नैसर्गिक आपत्तीनंतर दुःख व्यक्त करताना मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. थराली शहरामध्ये या पुरामुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती चामौलीचे अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी विवेक प्रकाश यांनी दिली..Pune Heavy Rain: पश्चिम भागात घाटमाथ्यावर पाऊस सुरूच.राज्य आपत्ती प्रतिसाद कृतिदल (एसडीआरएफ) आणि पोलिसांचे पथक शुक्रवारीच घटनास्थळी रवाना झाले असून त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. अतिवृष्टीमुळे महत्त्वाचे रस्ते आणि महामार्ग बंद झाल्याने मदत आणि बचाव कार्यामध्ये व्यत्यय येतो आहे. प्रशासनाने या भागामध्ये मदत छावण्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. थरालीस अन्य भागाशी जोडणाऱ्या कर्णप्रयाग महामार्गावर राडारोडा वाहून आल्याने येथील वाहतूक विस्कळित झाली आहे..Maharashtra Heavy Rain: पीक नुकसानीसह चिंताही वाढली.डुंगरी महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन या भागातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. मागील आठवड्यामध्येच उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये ढगफुटी होऊन मोठे नुकसान झाले होते. यामध्ये एकजण मरण पावला असून अन्य ६५ जण बेपत्ता झाले आहेत. या बेपत्ता नागरिकांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. अतिवृष्टीमुळे धराली गावाचे मोठे नुकसान झाले होते. हे गाव अक्षरशः उद् ध्वस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली..बचाव कार्यामध्ये लष्करथराली येथील मदत आणि बचाव कार्यामध्ये भारतीय लष्कर सहभागी झाले असून रुद्रप्रयाग आणि जोशीमठ या ठिकाणी वैद्यकीय, शोध आणि श्वान पथके दाखल झाली आहेत. थरालीमध्ये आधीच लष्कराचे जवान दाखल झाले आहेत. स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत हे जवान देखील मदत बचाव कार्यामध्ये सहभागी झाले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.